जालना, दि. 24 (जिमाका) :- दि. 24 जुलै 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता
जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारक महासंघ यांच्या रास्तभाव दुकानदारांच्या
काही मागण्या व अडीअडचणी संबंधी
निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी
सविता चौधर, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एस. दिवटे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत रास्तभाव दुकान परवानाधारक यांच्या महत्वाच्या मागण्या व
अडीअडचणीवर चर्चा करण्यात आली. राज्यातील
रास्तभाव दुकानामध्ये आजच्या महागाई निर्देशानुसार मार्जिनमध्ये योग्य ती वाढ
करण्यात यावी. पॉस मशीन संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी तसेच रास्तभाव दुाकानाच्या
मार्जिनची रक्कम वेळेवर मिळण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.
लाभार्थ्यांचे आधार क्रमाकांसह पडताळणी अर्थात ई- केवायसी करणे ही निरंतर प्रक्रिया असायला हवी. एपीएल
शेतकरी शिधापत्रिका धारकांना देण्यात येणाऱ्या सबसीडीबाबत चर्चा झाली. तसेच
रास्तभाव दुकानदारांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या.
या बैठकीस जिल्हातील रास्तभाव दुकानदार संघटनेची पदाधिकारी मनीत
कक्कड, प्रभाकर डोंगरे, बाबासाहेब हिवराळे, जगन्नाथ थोटे, नामदेव तनपुरे, विठ्ठल
काळे, संभाजी कळकटे, गोवर्धन धबडकर व इतर रास्तभाव दुकानदान उपस्थित होते. अशी
माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-


No comments:
Post a Comment