जालना, दि. 3 (जिमाका)
:- राज्यात मुलीच्या
जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन
योजना सुरु करण्यात आली आहे. पोस्ट खात्याच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी व मातांचे पोस्ट
ऑफिस बचत खाते अथवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक अकाऊंट आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधे
उघडून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या
योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर लाभ थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे
मिळणार आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी जिल्ह्यातील सर्व डाकघर आणि शाखा
डाकघरमध्ये खाते उघडून लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय प्रवर
अधिक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment