Thursday, 18 July 2024

जुन अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 सादर करण्याचे आवाहन

 

 

जालना, दि. 18 (जिमाका) :- सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणरपत्र ई-आर 1 माहे जुन, 2024 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. तरी जिल्ह्यातील कसूरदार आस्थापनांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी केले आहे.

या प्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रमाणे नियोक्त्यांची जुन, 2024 या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 दि. 31 जुलै, 2024 पर्यंत सादर करावे. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन, एम्प्लॉयरवर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्टमधील ई-आर 1 या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार कालावधीत या कार्यालयाच्या 02482299033  दूरध्वनीवर संपर्क करावा. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदी नुसार सर्व आस्थापनांनी जुन 2024 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहिती ई-आर 1 विवरणपत्र 31 जुलै, 2024 पुर्वी वरील वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment