जालना, दि.
11 (जिमाका)-जिल्हा ग्राहक परिषद, जालना या समितीवर नियुक्त करण्यात आलेले शासकीय
सदस्य व अशासकीय सदस्य यांची बैठक अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या
अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
बैठकीमध्ये
मुख्यमंत्री-लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी ग्रामीण भागातील महिला लाभार्थीसाठी
गावामध्येच सी.एस.सी. केंद्र सुरु करुन त्या ठिकाणी महिलाचे अर्ज भरण्यात यावे,
जेणेकरुन ग्रामीण भागातील महिलांना शहरात अर्ज भरण्यासाठी यावे लागणार नाही.
त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाया वाचेल. यावर चर्चा झाली. प्रत्येक गावामधील
मंजूर करण्यात आलेले सी.एस.सी केंद्र गावामध्येच कार्यरत राहावे. ज्या सी.एस.सी.
केंद्राला गावामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे, मात्र असे सी.एस.सी केंद्र हे
दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच शहरामध्ये चालवत असल्याचे आढळून आल्यास संबंधित सी.एस. सी.
केंद्रावर कार्यवाही करण्यात येईल, असे अपर
जिल्हाधिकारी श्रीमती मेत्रेवार यांनी स्पष्ट केले. ग्राहकांची कोणी फसवणूक करत
असेल तर संबंधिताची तक्रार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये करण्याचे आवाहन
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यानी केले.
बैठकीस
जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चोधर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकरी ज्ञानेश्वर दिवटे,
उपनियत्रंक वैधमापक शास्त्र अधिकारी आर.डि. दराडे, अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व
औषध प्रशासन पी, एस अंजिठेकर, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक
सुनिल चव्हाण, , जिल्हा ग्राहक सरक्षण समितीवर नियुक्त करण्यात आलेले अशासकीय
सदस्य डॉ. रमेश तारगे, विजय जाधव, जुमान चाऊस, संजय देशपांडे, दिलीप लाड, मोहन
इंगळे, अहेमद नुर, नंदकुमार देशपांडे, संदिप काबरा, बाबासाहेब सोनटक्के हे उपस्थित
होते.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment