जालना, दि. 19 (जिमाका) :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र
राज्य, पुणे यांचे आदेशान्वये सन 2024-25 या वर्षातील जिल्हास्त़र सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 15 वर्षेआतील मुले व 17 वर्षेआतील मुले व
मुली क्रीडा स्पर्धा 2024-25 चे आयोजन जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा फुटबॉल असोशिएशन,
जालना यांचे तांत्रिक सहकार्याने दि. 19 ते 20 जुलै 2024 या
कालावधीत रेल्वे मैदान येथे करण्यात आले.
जिल्हास्तर
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन दि. 19 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता
रेल्वे मैदान येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रेल्वे विभागाचे ए.डी.ई.
एन इंजिनिअर, लक्षू नायक, यांच्या शुभहस्ते
संपन्न झाले. यावेळी पी.डब्ल्यु आय, सेक्शन इंजिनिअर, मनोजकुमार निराला, जिल्हा क्रीडा अधिकारी, अरविंद विद्यागर, सचिव, जिल्हा
फुटबॉल असोशिएशन, जालना, रमेश शेळके, , सचिव, रेल्वे युनियन, जालना, शेख जावेद, सदस्य,
जिल्हा फुटबॉल असोशिएशन, जालना, मोहमद अकबर, विविध शाळांचे क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा
प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
दिनांक
19 जुलै 2024 रोजी 17 वर्षाआतील मुले या गटाने सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस सुरूवात
झाली, सदर गटात जिल्हयातील 15 संघानी सहभाग नोंदविला आहे.
सदर स्पर्धा
यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंच म्हणून शौकत पठाण, बाबा पठाण, मिलींद इंगळे, शेख रियाज,
शेख रहेमान, सय्यद सुलतान, योगेश अंभोरे हे काम पाहत आहे.
कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन क्रीडा अधिकारी रेखा परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी आरती
चिल्लारे यांनी केले. यावेळी खेळाडू, क्रीडा प्रेमी, क्रीडा संघटक, युवक युवती सह इतर
मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हास्तर
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद
विद्यागर यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी रेखा परदेशी, आरती चिल्लारे, सोपान
शिंदे, हारूण खान, राहुल गायके इत्यादी परिश्रम घेत आहेत. अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
दिली आहे. -*-*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment