जालना, दि. 11 (जिमाका)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तूळजापुर, जिल्हा धाराशिव यांच्या आस्थापनेवर सरळ सेवेने वर्ग 3 व वर्ग 4 मधील विविध पदे भरण्याकरीता आयबीपीएस कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने जालना जिल्हयातील इन्स्टीटुयट ऑफ फार्मसी, पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर, छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्ग, बदनापूर, जि. जालना आणि जेईएस महाविद्याल, जुनी एमआयडीसी, दुर्गामाता रोड, जालना या परीक्षा केंद्रावर दि. 13 व 14 जुलै 2024 रोजी तीन सत्रात लेखी परीक्षा आयोजित केली आहे.
वरील परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. आदेशान्वये परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी बुथ, फॅक्स/झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवणेकरीता याव्दारे प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत. हा आदेश दिनांक 13 जुलै 2024 व दिनांक 14 जुलै 2024 रोजीचे सकाळी 06.00 वाजेपासून ते सायंकाळी 07.00 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment