Thursday, 18 July 2024

शेतकऱ्यांना ई समृध्दी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

जालना, दि. 18 (जिमाका) :-  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या  https://esamridhi.in/#/login या संकेतस्थळाला भेट देवून अथवा क्युआर कोड स्कॅन करुन आपल्या शेतीमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई समृध्दी पोर्टलवर खरेदी प्री रजिस्ट्रेशन करावे व केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केंटींग अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयक्त विद्यामाने दरवर्षीप्रमाणे हंगाम 2024-25 मध्ये ही जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानूसार नाफेडमार्फत मका, तूर, चना, मुग, उडीद व सोयाबिन खरेदी करण्यात येणार आहे. नाफेड कार्यालयाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई समृध्दी पोर्टल सुरु केले असून नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यत पोहोचवावा यासाठी शेतकऱ्यांनी ई समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आपल्या शेतीमालास योग्य दर घ्यावा, याकरीता सदर पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment