Wednesday, 24 July 2024

कारगिल विजय दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 

 

जालना, दि. 24 (जिमाका) :-  शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी 25 वा कारगील विजय दिवस हा कारगिल विजय रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून दि. 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता वन विभागाकडून प्राप्त फळ झाडांचे वृक्षारोपण करुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथील  सैनिकी संकूलावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबितांसह इतर नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment