जालना, दि. 2 (जिमाका)- तहसील कार्यालय, जालना येथील कोतवाल पदाचे रिक्त पदे भरण्याकरिता शनिवार, दिनांक 6 जुलै 2024 रोजी दुपारी 03.30 ते 05.00 या वेळेत विविध परिक्षा केंद्रांवर होणार आहे. त्यानुषंगाने सदर परीक्षेचे प्रवेशपत्र तहसील कार्यालय, जालना येथून दिनांक 5 जुलै 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत वाटप करण्यात येत आहे. तरी सदर परिक्षेकरीता पात्र ठरलेल्या परिक्षार्थीयांनी वरील नमूद कालावधीत आपले प्रवेशपत्र हे तहसील कार्यालय, जालना येथून हस्तगत करुन घ्यावेत. प्रवेशपत्र हस्तगत करण्यासाठी येताना आपले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदानकार्ड/वाहन परवाना) इत्यादी पुरावे सोबत घेऊन यावेत, असे आवाहन जालना तहसीलदार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment