Monday, 18 April 2022

महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाव्दारे दि.27 एप्रिल रोजी जनसुनावणी

 


 

         जालना दि.18 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य नसल्यामुळे महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाव्दारे दि.27 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे जनसुनावणी घेण्यात येणार आहे. सदर जनसुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, श्रीमती रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत.

         जालना जिल्हयातील कोणतीही तक्रारदार पिडीत महिला कोणतीही पुर्वसुचना न देता या जनसुनावणीचा लाभ घेवुन स्थानिक पातळीवर थेट जनसुनावणीस उपस्थित राहुन लेखी तक्रार,समस्या आयोगापुढे मांडु शकते. या जनसुनावणीस जालना जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहुन आपल्या समस्या मांडाण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

Saturday, 16 April 2022

शेती आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी प्रयत्नरत राहू --- पद्मविभूषण खासदार शरद पवार शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळण्यासाठी नवीन प्रकल्प उभारणीबरोबरच इथेनॉल व सहवीज निर्मितीवर भर ---पालकमंत्री राजेश टोपे ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील --- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

 











     जालना दि.16 (जिमाका)-- शेतकरी हाच देशाचा आर्थिक कणा आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या बियाण्याची लागवड करण्याबरोबरच  नगदी पिके घेण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून त्यांचा विकास होण्याच्यादृष्टीने शेती आणि शेतकरी संपन्नतेसाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी केले. तर ऊस गाळपचा नवीन प्रकल्प उभारणी बरोबरच देशात मागणी असलेल्या सहवीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्प उभारणीवर अधिक भर देण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले. तसेच  ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना येथे 60 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज  झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते.

          कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे,आमदार रोहित पवार, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण,  माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, उत्तमराव पवार,शिवाजीराव देशमुख, मनोज मरकड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

          खासदार शरद पवार पुढे म्हणाले की, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट ही एक अग्रगण्य संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार बियाण्यांच्या निर्मितीबरोबरच शेतीला पूरक असणाऱ्या अनेक सुविधा राज्यभरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतात. या संस्थेची एक शाखा जालन्यात जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संस्थेसाठी पाथरवाला येथे 105 एकर जागेची खरेदीही करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून तयार होणारे उत्तम बियाणे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडेल, असा विश्वासही खासदार श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.  साखर कारखान्यांना आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची सातत्याने कमतरता भासत असते. या कारखान्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी

या संस्थेच्या माध्यमातूनच जालना जिल्ह्यातील होतकरू तरुणांना आवश्यक असे तांत्रिक शिक्षण देण्यात येऊन तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस निर्मिती होत असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप  करण्याचा प्रश्न भेडसावत आहे. राज्य शासनामार्फत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत या परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे शेवटच्या टिपराचे गाळप होण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने समर्थ सहकारी कारखाण्याचे तिसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे. या युनिटच्या उभारणीसाठी सर्वांनी  त्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

     वाहनांसाठी आवश्यक असलेल्या इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी इथेनॉल हा पर्याय संपूर्ण देशाने मान्य केला असून त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादनही करण्यात येत आहे. जालनासारख्या ठिकाणीही समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून इथेनॉल 2 लक्ष 10 हजार लिटर निर्मिती होत आहे. ही अत्यंत समाधानाची बाब असून या इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांना  निश्चित अधिकची रक्कम मिळणार असल्याचेही खासदार श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळण्यासाठी

 नवीन प्रकल्प उभारणीबरोबरच इथेनॉल व सहवीज निर्मितीवर भर

                                                           --पालकमंत्री राजेश टोपे

     पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, गत तीन वर्षांत जिल्ह्यात पावसाचे चांगले प्रमाण असल्याने  शेतकऱ्यांकडून ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या ऊसाचे शेवटच्या टिपराचे गाळप व्हावे, यादृष्टीने समर्थ सहकारी साखर कारखान्याने प्रयत्न केले. कारखान्यामार्फत प्रतिदिन 1 हजार 500 टन प्रतिदिन ऊस गाळपाची क्षमता वाढविण्यात आली आहे.

      येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकचा भाव मिळावा यासाठी केवळ गाळप करून चालणार नाही तर सहवीज व इथेनॉल प्रकल्प उभारण्याची गरज आहे. आज या ठिकाणी 60 हजार लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मितीचा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला असून येत्या काळात सागर सहकारी कारखाना येथेही असाच प्रकल्प उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    समर्थ सहकारी साखर कारखान्याने दरवर्षी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे कारखान्याला आतापर्यंत विविध 30 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून येणाऱ्या काळातही  शेतकऱ्यांच्या हितासाठीच कारखान्यामार्फत काम करण्यात येणार असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले.

ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील

                                                                   -- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

     सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, असे सांगून श्री. पाटील म्हणाले की, ज्या विभागात कारखान्याचे गाळप बंद झाले आहे, तेथील हार्वेस्टर ज्या भागात ऊस आहे,  तेथे आणण्यात येतील. तसेच नवीन साखर प्रकल्पाना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. ऊसापासून साखरेसोबतच इथेनॉल, वीजनिर्मितीवर अधिक भर दिला जावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. श्री. पाटील यांनी यावेळी कोरोनाच्या काळात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

     यावेळी श्री. दांडेगावकर, आमदार  रोहित पवार यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या योगेश असोबा यांनी संपादित केलेल्या 'आरोग्यदूत महाराष्ट्राचा'  या गौरव ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

 

पोकरा अंतर्गत वेअर हाऊसचे उदघाटन, प्रकल्पांना भेट

पाथरवाला येथील ऊस संशोधन व विकास प्रक्षेत्र केंद्राची पाहणी

     मराठवाड्यातील अनेक तरुण शेतकरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत, ही आनंदाची बाब असून सर्वच तरुण शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून उत्तम शेती करून शेती व्यवसाय समृद्ध करावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जिल्हा जालना अंतर्गत अंबड तालुक्यातील शेवगा येथील

विघ्नेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वेअर हाऊसचे उद्घाटन श्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राजेश टोपे, कृषी सचिव एकनाथ डवले, पोखराचे प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी,  यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमानंतर श्री. पवार यांनी अंबड तालुक्यातील दाढेगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जिल्हा जालना अंतर्गत उभारण्यात आलेल्या औजार बँक, शेडनेट, सामूहिक शेततळ्याची पाहणी  केली. यावेळी त्यांनी   लाभार्थ्यांशी संवाद साधला.

     या भेटी नंतर श्री. पवार यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील ऊस संशोधन व विकास प्रक्षेत्र केंद्राच्या विकास कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री राजेश टोपे, वेस्ट इंडियन शुगर मिल्सचे अध्यक्ष बी.बी. ठोबरे,  राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार सर्वश्री रोहित पवार, सतीश चव्हाण, विक्रम काळे आदी उपस्थित होते.

     श्री. शरद पवार यावेळी म्हणाले की, मराठवाडयात ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. पर्यायाने साखर कारखानदारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उसाचे उत्तम बेणाची निर्मिती आणि कारखान्यासाठी लागणाऱ्या कुशल प्रशिक्षीत कामगाराच्या उपलब्धतेकरीता पाथरवाला येथे ऊस संशोधन व विकास प्रक्षेत्र केंद्र स्थापन करण्यात आले आहे. लवकरच या ठिकाणी ऊसाचे संशोधन केंद्र व प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. याचा लाभ मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल.

Wednesday, 6 April 2022

00 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्ह्यात 02 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.6 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  00 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात –  जालना शहर -1, नेर -1, मंठा तालुक्यातील  - निरंक,  परतुर  तालुक्यातील – निरंक, घनसावंगी तालुक्यातील –निरंक अंबड तालुक्यातील –निरंक, बदनापुर  तालुक्यातील – निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील –निरंक, भोकरदन तालुक्यातील – निरंक,  इतर जिल्ह्यातील –  निरंक अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 02 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 02 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  72374 असुन  सध्या रुग्णालयात- 00 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14254  दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 128 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-801883  एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -02, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 67521 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 730290 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1194, एकुण प्रलंबित नमुने-00, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -540950

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –00,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 13252 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती –00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -00, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-00, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 66305,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-03 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1260469 मृतांची संख्या-1213

        जिल्ह्यात 00  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:- 

                                                                                  अ.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

2

67521

डिस्चार्ज

0

66305

मृत्यु

0

1213

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

835

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

378

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

128

490423

पॉझिटिव्ह

2

56026

पॉझिटिव्हीटी रेट

1.6

11.42

रॅपीड अँटीजेन टेस्ट

0

311598

पॉझिटिव्ह

0

11495

पॉझिटिव्हीटी रेट

#DIV/0!

3.69

एकुण टेस्ट

128

802021

पॉझिटिव्ह

2

67521

पॉझिटिव्ह रेट

1.56

8.42

क.      कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

134568

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

72374

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

3

 होम क्वारंटाईन      

3

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

1260469

हाय रिस्क  

382433

लो रिस्क   

878036

 रिकव्हरी रेट

 

98.20

मृत्युदर

 

1.80

                                     ङ  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

4660

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

955

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

1849

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

462

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

1888

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

179

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

1856

 

 

3571

-*-*-*-*-*-*-