Tuesday, 23 June 2020

जिल्ह्यात सहा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर नऊ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


      जालना, दि. 23 (जिमाका) :- जिल्हा सामान्य रुग्णालयातून जालना शहरातील अलंकार टॉकीज परिसरातील-1, राज्य राखीव पोलीस दलातील–3 जवान,समर्थनगर -1 ,उतार गल्ली – 2 सोनक पिंपळगाव  ता. अंबड येथील -2,
अशा एकुण नऊ रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील तेली समाज रामनगर परिसरातील-1, संभाजीनगर -2, इंद्रप्रित अपार्टमेंट  इंदेवाडी  येथील-2, नुतन कॉलनी भोकरदन– 1 अशा एकुण  सहा  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
            भोकरदन शहरातील नुतन कॉलनी परिसरातील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यास दि. 19 जुन 2020 रोजी भोकरदन शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दि.22 जुन 2020 रोजी संबंधित रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यास जालना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तेथुन त्या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित (Refer) केले. अत्यावस्थ परिस्थितीतील या रुग्णास दि. 22 जुन 2020 रोजी सामान्य रुग्णालयात आय.सी.यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 22 जुन 2020 रोजी रात्री 10.20 मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाला, मृत्युनंतर लगेचच त्यांच्या लाळेचा नमुना घेऊन प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी औरंगाबाद येथे दि. 22 जुन 2020 रोजी पाठविला होता.  त्याचा अहवाल दि. 23 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
             जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3740 असुन  सध्या रुग्णालयात -108, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1420, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–92, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4593, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने06 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -384, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -4101 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-404 एकुण प्रलंबित नमुने-104, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1300.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती13, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 1212, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-75, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-225, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -108, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-136, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 9, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-257, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -109, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-06, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-10471, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 12 एवढी आहे.  
        आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 225 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-14, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-19, संत रामदास वसतिगृह जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-00, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-26, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना–59 मॉडेल स्कुल परतुर-06, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-02, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-11, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-15 मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी–00,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -13, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00, हिंदुस्थान मंगल  कार्यालय, जाफ्राबाद-12, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद –00, शेठ इ.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -04. आय.टी. आय. कॉलेज जाफ्राबाद- 41

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 863 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 827 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 61 हजार 430 असा एकुण 3 लाख 88 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-*-

Monday, 22 June 2020

सामाजिक अंतर न राखणारे 58 व्यक्तीकडून 11 हजार 600 रुपये व तोंडाला मास्क न लावणा-या 9 नागरिकांकडून 4 हजार 500 रुपये असा 16 हजार 600 रुपये दंड वसुल


        जालना, (जिमाका) दि, 22 :- जिल्हा प्रशासनाकडून गठीत करण्यात आलेले एकूण 8 पथकाकडून शहरामध्ये सकाळच्या व दुपारच्या सत्रामध्ये सामाजिक अंतर न राखणारे नागरिक, तोंडाला मास्क न लावणारे नागरिक व इतर बाबींसाठी 58 नागरिकांवर कार्यवाही करण्यात आली असून  पथकांमार्फत 58 व्यक्तींकडून एकूण 11 हजार 600 रुपये व तोंडाला मास्क न लावणा-या 9 नागरिकांकडून 4 हजार 500 रुपये असे एकूण 16 हजार 100 रुपये दंड आकारण्यात आला असल्याचे, उपपोलीस अधिक्षक जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
                    तसेच नगर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रतिबंध क्षेत्रांमध्ये हातगाडीवर भाजीपाला व फळे विक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली  आहे.
-*-*-*-*-*-*-

जिल्ह्यात सतरा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर तीन रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना, दि. 22 (जिमाका) :- जिल्हा सामान्य रुग्णालयातून जालना शहरातील उडपी हॉटेल जवळील – 1, राज्य राखीव पोलीस  दलातील 2 जवान अशा एकुण तीन रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील मंगळ बाजार परिसरातील – 2, हकीम मोहल्ला -1,  नाथ बाबा गल्ली – 1, वाल्मीक नगर – 2 राज्य राखीव दलातील -1 जवान, अंबड शहरातील चांगले नगर येथील – 1, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील- 9 अशा एकुण  सतरा  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
             जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3657 असुन  सध्या रुग्णालयात -98, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1400, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–29, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4490, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने17 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -378, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -4077 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-404 एकुण प्रलंबित नमुने-31, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1291.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–16, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 1199, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -11, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-297, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–6,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-98, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-12, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 3, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-248, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-113, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-06, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-10326, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 11 एवढी आहे.  

        आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 297 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-84, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-10, संत रामदास वसतिगृह जालना-06, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-16, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-31, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना–56 मॉडेल स्कुल परतुर-5, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-03, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-12, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-14, मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी–00,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -12, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00, हिंदुस्थान मंगल  कार्यालय, जाफ्राबाद-03, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद –9, शेठ इ.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -33.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 170 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 854 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 45 हजार 230 असा एकुण 3 लाख 72 हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-*-


Saturday, 20 June 2020

सामाजिक अंतर न राखणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाची कारवाई



        जालना,दि. 20 (जिमाका):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सामाजिक अंतर न राखणाऱ्या 63 व्यक्तींकडून 12 हजार 600 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 17 व्यक्तींकडून 8 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हातगाडीवर भाजीपाला व फळविक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
            नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये,  सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
*******