Sunday, 6 October 2019

निवडणुक निरीक्षकांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये अधिकाधिक जनजागृती करा- निवडणूक निरीक्षक सहदेब दास


जालना,दि.6 - भारत निवडणूक आयोगाने परतूर व घनसावंगी विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक निरिक्षक (सामान्य) सहदेब दास यांनी जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणेकडून  निवडणूक पुर्व तयारीचा आढावा घेत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्पीप मोहिमेंतर्गत मतदानाविषयी अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, निवडणूक निर्णय अधिकारी सर्वश्री भाऊसाहेब जगताप, गणेश नि-हाळी, शिवकुमार स्वामी, श्रीमंत हारकर, शशीकांत हदगल यांच्यासह निवडणुकीसाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
            निवडणूक निरीक्षक श्री सहदेब दास म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीप मोहिमेंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करावी. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या  मतदान केंद्रावर कमी मतदान झाले अशा ठिकाणी जनजागृतीवर विशेष भर देण्यात यावा.  त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांना मतदानाच्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा पुरविण्याबरोबरच दिव्यांगाचा समावेश असलेल्या टीमच्या माध्यमातुन मतदानाविषयी जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            निवडणुकीच्या पूर्वतयारीची माहिती देताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, पाचही विधानसभा मतदारसंघात एकूण 1653 मतदान केंद्र असुन यापैकी 38 मतदान केंद्र संवेदनशिल आहेत.  संवेदनशिल मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार आहे.  मतदानाविषयी मतदारांमध्ये निबंध, रांगोळी स्पर्धा, रॅली या  माध्यमातुन जनजागृती करण्यात येत असुन दिव्यांगासाठी निकेश मदारे यांची आयकॉन म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. श्री मदारे यांच्यामार्फतही विधानसभा मतदारसंघात जनजागृती करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, साहित्य, वाहने यासह इतर आवश्यक बाबींचे काटेकोर असे नियोजन करण्यात आले असुन निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तयारीची माहिती निवडणूक निरीक्षकांना दिली.
******* 



Friday, 4 October 2019

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक निरिक्षक जिल्ह्यात दाखल



            जालना,4:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील पाच  विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मा.निवडणूक निरिक्षक जालना जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
            99 –परतूर व 100- घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुक निरीक्षक (सामान्य) म्हणून सहदेब दास भ्रमणध्वनी क्र. 7821043178 तर निवडणुक निरीक्षक (खर्च) साठी अरुण कुमार  भ्रमणध्वनी क्र. 7821013447  हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत.  त्यांचा स्थानिक निवासी पत्ता शासकीय विश्रामगृह, सर्वे क्र. 488, जालना असा आहे.
            101-जालना, 102 बदनापुर व 103 भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुक निरीक्षक (सामान्य) श्री धरमपाल भ्रमणध्वनी क्र. 7821018953 तर निवडणुक निरीक्षक (खर्च) साठी हुकूघा सेमा भ्रमणध्वनी क्र. 7821008549  जिल्ह्यात दाखल झाले असुन त्यांचा स्थानिक पत्ता शासकीय विश्रामगृह, सर्वे क्र. 488, जालना असा आहे.
            संपुर्ण जालना जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून ए.जी बाबु हे जिल्ह्यात दाखल झाले असुन त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7821006272 तर स्थानिक पत्ता पोलीस क्लब, पोलीस मुख्यालय, जालना असा आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ एकुण 101 उमेदवारांनी दाखल केले 140 नामनिर्देशनपत्र



            जालना दि. 4 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्‍या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात गुरुवार दि. 4 ऑक्टोबर २०१९ रोजी एकुण 101 उमेदवारांनी 140 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. 
            99- परतुर मतदारसंघात 20 उमेदवारांनी 24 नामनिर्देशनपत्रे, 100-घनसांवगी 16 उमेदवार                  24 नामनिर्देशनत्रे, 101-जालना 43 उमेदवारांनी 51 नामनिर्देशनपत्रे, 102- बदनापुर 14 उमेदवारांनी                       26 नामनिर्देशनपत्रे तर 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये 08 उमेदवारांनी 15 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
            जिल्हयात आतापर्यंत एकूण पाच विधानसभा मतदारसंघात 150 उमेदवारांनी 217 नामनिर्देशन पत्रे दाखल केले असल्याची माहिती संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. विधानसभा मतदारांघ निहाय दि. 4 ऑक्टोबरअखेर प्राप्त एकूण नामनिर्देशन पत्रांची संख्या 99-परतुर मतदारसंघातील 24 उमेदवारांची 32 नामनिर्देशन पत्रे,100- घनसावंगी 29 उमेदवारांची 41 नामनिर्देशन पत्रे, 101-जालना 64 उमेदवारांची 85 नामनिर्देशन पत्रे, 102 बदनापुर 24 उमेदवारांची 39 नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत तर 103- भोकरदन विधानसभा मतदारसंघात 09 उमेदवारांची 20 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.

Thursday, 3 October 2019


मतदार जनजागृती  चित्ररथास  जिल्हाधिकाऱ्यांनी  दाखविली  हिरवी  झेंडी
जालना, दि. 3 :- भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणात जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, यासाठी प्रशासनाच्यावतीने मतदार जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथास आज जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी हिरवी झेंडी दाखवून मतदार जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ केला. तर  उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली  मोतियळे  यांच्या  हस्ते  फीत कापण्यात आली. स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ  विविध भागात मतदार जनजागृती करेल. याव्दारे मतदारांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. जिल्हयातील  5 विधानसभा मतदारसंघात एकुण 15 लाख 21 हजार 324 मतदार आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत ही स्वीप अंतर्गत मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असून मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केला जात आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. तर गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे.. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदानाचा हक्क बजावून आपलं कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी यावेळी केले.
हा चित्ररथ जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातून फिरविण्यात येणार असुन                     101- जालना विधानसभा मतदारसंघात  3 ते 7 ऑक्टोबर 2019, 99-परतूर मध्ये 8 ते 10 ऑक्टोबर,               100-घनसावंगीमध्ये 11 ते 13 ऑक्टोबर, 103-भोकरदनमध्ये 14 ते 16 ऑक्टोबर तर 102- बदनापुर विधानसभा मतदारसंघामध्ये 17 ते 19 ऑक्टोबर , 2019 दरम्यान चित्ररथाच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येणारन आहे.
यावेळी प्र. जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, नायब तहसिलदार गणेश पोलास, शरद आडणे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.





विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९
एकुण 47 उमेदवारांनी दाखल केले 64 नामनिर्देशनपत्र
            जालना दि. 3 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्‍या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात गुरुवार दि. 3 ऑक्टोबर २०१९ रोजी एकुण 47 उमेदवारांनी 64 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. 
            99-परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये सरिता मारोती खंदारे (भारतीय कम्युनिष्ट पक्ष (मार्क्सवादी), बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) (भारतीय जनता पार्टी), राहुल बबनराव यादव  (लोणीकर) (भारतीय जनता पार्टी) व (अपक्ष), अझहर युनुस शेख (अपक्ष) व जेथलिया सुरेशकुमार कन्हैय्याला (इंडियन नॅशनल काँग्रेस) अशी एकुण सहा नामनिर्देशनपत्रे.                    
            100-घनसावंगी मतदारसंघामध्ये  राजेश अंकुशराव टोपे (राष्ट्रवादी काँगेस पक्ष), मनिषाताई राजेश टोपे (राष्ट्रवादी काँगेस पक्ष), डॉ. अप्पासाहेब ओंकार कदम (स्वतंत्र भारत पक्ष) दोन नामनिर्देशनपत्र, हिकमत बळीराम उढाण (शिवसेना) व (अपक्ष), बाबासाहेब उत्तमराव शिंदे (अपक्ष) दोन नामनिर्देशनपत्र, हसुन मोहिद्दीन शेख (बसपा), बालासाहेब रामप्रसाद बर्डे (अपक्ष), शिवाजी गणपत बर्डे (अपक्ष), इनायतखान अब्बास खान (अपक्ष) दोन नामनिर्देशनपत्र, संतोष सुरेश मोरे (अपक्ष), वैजिनाथ प्रभाकर मुकणे (अपक्ष) अशी एकुण पंधरा नामनिर्देशनपत्र,
            101-जालना विधानसभा मतदारसंघामध्ये कैलास किशनराव गोरंट्याल (इंडियन नॅशनल काँग्रेस) तीन नामनिर्देशनपत्र, अंकुश तुकाराम शितोळे (अपक्ष) रतन आसाराम लांडगे (अपक्ष), परशुराम नारायण यादव (अपक्ष) दोन नामनिर्देशनपत्र, मोहंम्मद मुजाहेद अब्दुल बारीसिद्दीकी (अपक्ष), सत्तार नसीर अहेमद शेख (अपक्ष), जुनेद युनुस कुरेशी (अपक्ष), हरिभाऊ अंबादास रत्नपारखे (बहुजन समाज पक्ष), प्रताप हसनराव लहाने (स्वतंत्र भारत पक्ष) दोन नामनिर्देशनपत्रे, बबन गोविंदराव बोर्डे (अपक्ष), अहेमद रहिम शेख (अपक्ष), बिजलाबाई विठ्ठल म्हस्के (अपक्ष), सिमा अर्जुनराव खोतकर (शिवसेना) दोन नामनिर्देशनपत्र, प्रभुदास गावंजी वानखेडे (अपक्ष), जालिंदर केशव वाघमारे (अपक्ष), द्वारकाबाई काशिनाथ लोंढे (अपक्ष), रुक्मिण सुभाष आठवले (अपक्ष), रेखाबाई धोंडीराम खांडे (अपक्ष), शे. रफीक शे. लतिफ अ (इंडियन युनियम मुस्लीम लीग), रंजित काशिनाथ निकाळजे (अपक्ष), जॉर्ज रॉबिनसन शिंदे (मराठवाडा मुक्ती मोर्चा) अशी 26 नामनिर्देशनपत्रे.
            102 बदनापुर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद खेमचंद अडागळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), चौधरी रुपकुमार नेहरुलाल (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) (दोन नामनिर्देशनपत्र), बाबु श्रावण पवार (शिवसेना) व (अपक्ष), विष्णु भागाजी इंगोले (अपक्ष), राहुल मधुकर खरात (मराठवाडा मुक्ती मोर्चा), ॲड भास्कर बन्सी मगरे (शिवसेना) व (अपक्ष), चाबुकस्वार राहुल निरंजन (अपक्ष), ज्ञानेश्वर हिरामन गरबडे (बहुजन समाज पक्ष), सुनिल नेहरुलाल चौधरी (अपक्ष) अशी बारा नामनिर्देशनपत्रे
            तर 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये संतोष रावसाहेब दानवे (भारतीय जनता पार्टी) व चंद्रकांत पुंडलिक  दानवे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) चार अशी पाच नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्या त्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
*******




विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ एकुण 47 उमेदवारांनी दाखल केले 64 नामनिर्देशनपत्र


            जालना दि. 3 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्‍या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात गुरुवार दि. 3 ऑक्टोबर २०१९ रोजी एकुण 47 उमेदवारांनी 64 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत
            99- परतुर मतदारसंघात उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्रे, 100-घनसांवगी 11 उमेदवार 15 नामनिर्देशनत्रे, 101-जालना 20 उमेदवारांनी 26 नामनिर्देशनपत्रे, 102- बदनापुर उमेदवारांनी 12 नामनिर्देशनपत्रे तर 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये 02 उमेदवारांनी 05 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
            जिल्हयात आतापर्यंत एकूण पाच विधानसभा मतदारसंघात 57 उमेदवारांची 77 नामनिर्देशन पत्रे दाखल केले असल्याची माहिती संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहेविधानसभा मतदारांघ निहाय दि. 3 ऑक्टोबरअखेर प्राप्त एकूण नामनिर्देशन पत्रांची संख्या 99-परतुर मतदारसंघातील 06 उमेदवारांची 08 नामनिर्देशन पत्रे,100- घनसावंगी 13 उमेदवारांची 17 नामनिर्देशन पत्रे, 101-जालना 26 उमेदवारांची 34 नामनिर्देशन पत्रे, 102 बदनापुर 10 उमेदवारांची 13 नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत तर, 103- भोकरदन विधानसभा मतदारसंघात 02 उमेदवारांची 05 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.

Tuesday, 1 October 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसाठी आज तहसिल कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन




            जालना, दि. 01  -  101-जालना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसाठी दि. 28 व 29 सप्टेंबर, 2019 रोजी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रशिक्षणास जे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी गैरहजर होते त्यांच्यासाठी 2 ऑक्टोबर, 2019 रोजी सकाळी 11-00 वाजता तहसिल कार्यालय, जालना येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असुन संबंधितांनी या प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 101-जालना विधानसभा मतदारसंघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.