Thursday, 2 August 2018

‘फेक न्यूज’च्या प्रसाराला आळा घालून समाजस्वास्थ्य टिकवावे · ‘फेक न्यूज : दक्षता व परिणाम’ या विषयावर आयोजित पत्रकारांसाठीच्या कार्यशाळेतील सूर








            जालना, दि. 2 – पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक असुन वृत्तपत्राच्या माध्यमातुन देण्यात येणारी बातमी ही विश्वासार्ह असते.  परंतू समाजमाध्यमाद्वारे देण्यात येणाऱ्या बातम्यांमध्ये विश्वासार्हता नसल्याने पत्रकारांनी फेक न्यूज व अफवांच्या प्रसाराला आळा घालून समाजस्वास्थ्य टिकवावे, असा सूर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या फेक न्युज दक्षता व परिणाम या पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत निघाला.
    या कार्यशाळेत पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय)  सोपानराव बांगर, जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर, व्ही.एस.एस. महाविद्यालयाच्या संगणशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रोहित पिपरिये, माहिती सहाय्यक अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.
   यावेळी पोलीस निरीक्षक श्री गौर म्हणाले की, आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. या समाजमाध्यमांद्वारे पाठविण्यात येणाऱ्या संदेशाची शहानिशा न करता येणारा प्रत्येक संदेश फॉरवर्ड करण्यावर सहसा नेटीजन्सचा भर असतो.  शहानिशा न केल्यामुळे संदेशाच्या माध्यमातुन देण्यात आलेल्या प्रलोभनाला बळी पडल्याच्या अनेक घटना दररोज समोर येत आहेत.  या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत असुन  यापासुन वाचण्यासाठी प्रत्येकाने आलेल्या संदेशाची शहानिशा करुनच तो संदेश पुढे पाठविण्याची गरज असल्याचे सांगत अशा प्रकारांची माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाल्यास ती  जालना जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या सायबर सेल कक्षाला कळविण्यात यावी.  जेणेकरुन दोषींवर कारवाई करुन अशा घटना घडणार नाहीत, यासाठी आवश्यक ती कारवाई करणे सोईचे होणार असल्याचेही श्री गौर यांनी यावेळी सांगितले.
            प्रा. रोहित पिपरिये म्हणाले की, आजघडीला प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन असुन या फोनच्या माध्यमातुन विविध ॲप्सचा वापर करण्यात येतो.  या ॲप्सचा वापर करताना सुरक्षीतता बाळगण्याची गरज असुन कुठलेही ॲप डाऊनलोड करताना त्यामध्ये देण्यात आलेले ॲग्रीमेंट प्रत्येकाने वाचुन मगच ते ॲप वापरण्याची गरज आहे. कुठल्याही संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती  अपलोड करताना ती वेबसाईट https असावी. त्या वेबसाईटच्या सुरूवातीला https असणे आवश्यक आहे.  पैशाची प्रलोभने दाखवुन अनेक फेकन्युज विविध लिंक्सच्या माध्यमातुन समाजमाध्यमांवर पाठविण्यात येतात.  या लिंक्स उघडताना त्याची सत्यता तपासून पाहणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगून  फेकन्युज ओळखण्यासाठी त्या पोस्टची तारीख, पोस्टमध्ये दिलेला संपर्क क्रमांक, ज्या पोस्ट टाकलेली आहे त्या व्यक्तीचे असलेले अधिकार अथवा त्याला त्या विषयामध्ये असलेली माहिती, पोस्टचा हेतु तसेच त्याबाबतची अचूकता तपासणे गरजेचे असल्याचेही श्री पिपरिये यांनी यावेळी सांगितले.
            फेकन्युजचा प्रसार रोखण्यासाठी व्हॉटसअप, फेसबुक या समाजमाध्यंमामध्ये बदल करण्यात आले असुन एखादी पोस्ट चुकीची अथवा फेकन्युज असेल तर Reporting Fake News  या नावाचे ऑप्शनमध्ये तशी तक्रार करण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे  सांगत फेकन्युजसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी उपस्थित पत्रकारांनी समाजमाध्यमाद्वारे पसरविण्यात येणाऱ्या विविध शंकाचे पोलीस निरीक्षक श्री गौर यांनी निरसन केले.
            कार्यशाळेचे आभार पोलीस उपअधीक्षक श्री बांगर यांनी मानले. 
            या कार्यशाळेस विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार, जिल्हा प्रतिनिधी, छायाचित्रकार,  इलेक्टॉनिक्स प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, कॅमेरामन यांच्यासह पोलीस व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
*******

Friday, 18 May 2018

जालना महोत्सवानिमित्त शहरात शोभायात्रा संपन्न







       जालना, दि. 18 –  जालना शहरामध्ये 18 ते 22 मे दरम्यान जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवाच्या अनुषंगाने शहरामध्ये आज शुक्रवार दि. 18 मे रोजी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेची सुरुवात मस्तगड येथील मम्मादेवी मंदिर येथे  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आली.  ही शोभायात्रा मुथा बिल्डिंग, महावीरचौक, मामाचौक, वीर सावरकर चौक, फुलबाजार, नेहरुरोड, काद्राबाद, मंगळबाजार मार्गे जाऊन शिवाजी चौक येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन शोभायात्रा विसर्जित करण्यात आली.   
शोभायात्रेमध्ये विविध वेशभुषेमधील स्थानिक कलावंतांसह भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हातात टाळ, वीणा घेत अभंग गाऊन या शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवत उपस्थितांचा उत्साह वाढवून या जालना महोत्सवामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.  
यावेळी घनश्याम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, विरेंद्र धोका,अकलंक मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तावरावाला, सुनिल पाचमा, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नीता पंकज जैन, डॉ. संजय पुरी, राजेश शहा, प्राजक्ता पाटील, गोपाल गोयल, अर्जून गेही, ह.भ.प. रमेश महाराज वाघ, विठ्ठल महाराज  यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेली  वारकरी मंडळी व विविध कलावंतांची तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Thursday, 17 May 2018

जालना महोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या जिल्ह्यातील कलावंतांचा गुणगौरव करणार -- पालकमंत्री बबनराव लोणीकर




        जालना, दि. 17 –  जालना शहरामध्ये 18 ते 22 मे दरम्यान जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा महोत्सव यशस्वीरित्या तसेच सुरळीतपणे पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महोत्सवादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस प्रशासनास दिले.     
            जालना महोत्सव 2018 च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री   श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, घनश्याम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, विरेंद्र धोका,अकलंक मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तावरावाला, सुनिल पाचमा, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नीता पंकज जैन, डॉ. संजय पुरी, राजेश शहा, प्राजक्ता पाटील, गोपाल गोयल, अर्जून गेही, सुरेश केसापुरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवामध्ये अनेक सिनेकलाकार तसेच राज्यातील महत्वाचे व्यक्ती कार्यक्रमास उपस्थित राहणार असुन कार्यक्रमास जिल्ह्यासह राज्यातून नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.  त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे.  जालना महोत्सवामध्ये स्थानिक कलावंताना एक हक्काचे व्यासपीठ मिळणार असुन या माध्यमातुन त्यांना आपली कला सादर करता येणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातुन एक आपलेपणानाची भावना या कार्यक्रमातून समाजामध्ये दृढ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत हा महोत्सव यशस्वी होऊन जालना जिल्ह्याचं नाव देशपातळीवर जावा यासाठी पदाधिकारी, अधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने या महोत्सवात सहभाग नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातुन जिल्ह्याचा देशपातळीवर नावलौकिक केला आहे.  देशपातळीवरील अनेक पुरस्कार या कलावंतांनी पटकावलेले आहेत.  अशा कलाकांराना त्यांची कला जिल्हा वासियांना या महोत्सवाच्या माध्यमातुन पहाता येणार आहे.  तसेच या कलाकारांचा गुणगौरवही या महोत्सवाच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे. केवळ कलाकारच नाही तर प्रशासनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांही या महोत्सवामध्ये सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगत शहरातील उद्योजकांच्या पुढकाराने हा महोत्सव होत असुन सुंदर अशा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल त्यांनी महोत्सव आयोजन समितीचे अभिनंदही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, मागील अनेक वर्षाच्या नंतर जालना शहरामध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असुन जिल्हावासियांसाठी ही एक मेजवानी ठरणार आहे. महोत्सवादरम्यान स्वच्छतेची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाने चोखपणे पार पाडण्याबरोबरच अखंडित वीज पुरवठा राहण्यासाठी विद्युत विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी.  तसेच महोत्सवाच्या ठिकाणी नागरिकांना सहजपणे पोहोचता यावे यासाठी एस.टी. महामंडळाने बसेसची सोय करण्याची सुचनाही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी केली.
            जालना महोत्सव 2018 यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही देत महोत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश देऊन या महोत्सवात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहनही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी केले.
            यावेळी विरेंद धोका यांनी 18 ते 22 मे दरम्यान घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.  बैठकीस जालना महोत्सव 2018 समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची सर्वांची साथ: सर्वांचा विकास” लोकराज्यच्या विशेषांकाचे प्रकाशन




            जालना, दि. 17 - 4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची सर्वांची साथ : सर्वांचा विकास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने  मे चा  विशेषांक तयार करण्यात आला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर तसेच राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
            यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, घनश्याम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, विरेंद्र धोका,अकलंक मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तावरावाला, सुनिल पाचमा, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नीता पंकज जैन, डॉ. संजय पुरी, राजेश शहा, प्राजक्ता पाटील, गोपाल गोयल, अर्जून गेही, सुरेश केसापुरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Wednesday, 16 May 2018

शेतकऱ्यांशी केंद्रीय पथकाने साधला संवाद

जालना, दि, 16 :- बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील शेतकऱ्यांशी आज दिनांक 16 मे रोजी केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
केंद्रीय पथकामध्ये केंद्रीय सह सचिव अश्वीनी कुमार, आर.डी. देशपांडे,  के. डब्ल्यु. देशकर,  चाहत सिंग, एम.जी. टेंभुर्णे, ए. मुरलीधरन, डॉ. डी.के. श्रीवास्तव यांचा समावेश होता. यावेळी कृषी आयुक्त एस.पी. सिंह, प्र. जिल्हाधिकारी पी.बी. खपले, प्र.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उर्मिला चिखले, तहसीलदार योगिता कोल्हे आदींची उपस्थिती होती.
पथकाने सर्व प्रथम भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव व सिपोरा बाजार या गावांना भेट दिली. त्यानंतर जाफ्राबाद तालुकयातील बोरगाव या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. भोकरदन, जाफ्राबाद भागात कापसाची  मोठया प्रमाणात लागवड करण्यात येते. परंतु बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाला दिली. यावेळी पथकातील सदस्यांनी गावातील शेतकऱ्यांकडून त्यांनी किती एकरावर कापसाची लागवड केली होती,  किती उत्पन्न झाले, कापूस  पिकाला बोंड अळीचा प्रादुर्भाव कधी झाला, कोणत्या औषधाची फवारणी केली, विमा उतरवला होता काय आदी बाबींची माहिती जाणून घेतली.
---*-*-*-*-*-*-*

Monday, 14 May 2018

जालना महोत्सव 2018 च्या मंडपाची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून पाहणी





            जालना, दि. 14 - जालना शहरात 18 ते 22 मे, 2018 दरम्यान जालना महोत्सव 2018 आयोजित करण्यात आला असुन या महोत्सवाच्या मंडपाची  पाहणी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी  कलश सीड्स मैदान, मंठा चौफुली, रिंग रोड, जालना  येथे प्रत्यक्ष भेट देऊन केली.
            यावेळी घनश्याम गोयल, विरंद्रप्रकाश धोका, रमेशचंद्र बंग, नरेंद्र मित्तल, सुभाषचंद्र देविदान, सुदेश करवा, उमेश पंचारिया-गौड, बंडूभाऊ मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तवारावाला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, मुख्यधिकारी   संतोष खांडेकर, वास्तुशास्त्र श्रीमती राठी आदींची उपस्थिती होती.




जालना महोत्सव 2018 च्या मंडपाचे
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते पुजन

            जालना, दि. 14 - जालना शहरात 18 ते 22 मे, 2018 दरम्यान जालना महोत्सव 2018 आयोजित करण्यात आला असुन या महोत्सवाच्या मंडपाचे पुजन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते कलश सीड्स मैदान, मंठा चौफुली, रिंग रोड, जालना  येथे करण्यात आले.
            यावेळी घनश्याम गोयल, विरंद्रप्रकाश धोका, रमेशचंद्र बंग, नरेंद्र मित्तल, सुभाषचंद्र देविदान, सुदेश करवा, उमेश पंचारिया-गौड, बंडूभाऊ मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तवारावाला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, मुख्यधिकारी   संतोष खांडेकर, वास्तुशास्त्र श्रीमती राठी आदींची उपस्थिती होती.