Saturday, 16 July 2016

जीवनावश्यक वस्तु व डाळींची साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना,

दि. 16 - जिल्हयातील डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी यांनी डाळी तसेच जिवनावश्यक वस्तुंचा साठा आणि विक्री करताना त्यामध्ये पारदर्शकता ठेवावी. जिवनावश्यक वस्तु विशेषत: डाळींची साठेबाजी आणि जादा भावाने विक्री करणाऱ्यांवर जिवनावश्यक वस्तु अधिनियमाअंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी  केल्या.
          जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार, प्रतिबंध व  जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे बोलत होते. या बैठकीस सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एन. भारस्कर, नायब तहसिलदार गणेश पोलास  यांची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की, जिल्हयामध्ये जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार, प्रतिबंध व  जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पुरवठा विभागामार्फत विशेष दक्षता घेण्यात येत आहे. या वस्तुंची साठेबाजी तसेच जादा दराने विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिवनावश्यक वस्तुंबाबत तक्रारी आल्यास संबंधितांवर धाडी टाकून त्यांच्यावर अधिनियमाअंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या सूचना  देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी       श्री जोंधळे यांनी यावेळी दिली. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत डाळींचा रास्त भावाने पुरवठा करण्यात येणार असल्याने डाळीची आवक, साठा, विक्री याबाबतच्या नोंदी संबंधित व्यापाऱ्यांनी  पारदर्शक आणि अद्यावत ठेवावेत.  ज्या व्यापाऱ्यांचे परवाने नुतनीकरण झालेले नाही अशांनी ते तातडीने करुन घ्यावेत.  तसेच प्रत्येक तहसिल कार्यालयात प्रलंबित असलेले परवाने तातडीने निर्गमित करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            या बैठकीस व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीष पंच, दालमिल असोशिएशने अध्यक्ष अनिल पंच, अनिल सोनी, सुरेश भाकड, जालन्याचे नायब तहसिलदार एन.वाय. दांडगे, बदनापुरचे श्रीमती पापुलवाड, घनसावंगीचे श्री मिराशे, जाफ्राबादचे श्री राजपुत, जिल्हा पुरवठा कार्यालयातील बालाजी जामगे, एस.एस. काळे, एस.एम. पगार यांच्यासह  जिल्ह्यातील आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी आदी उपस्थित होते.

*******

Tuesday, 12 July 2016

जालना जिल्ह्यात 32.90 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 12 जुलै, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 32.90 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना-47.25 (275.44), बदनापूर-47.60 (256.20), भोकरदन-29.75 (197.39),  जाफ्राबाद 25.00 (183.20), परतूर-45.60 (353.40), मंठा- 29.00 (301.00), अंबड-12.29 (323.57) घनसावंगी-26.71 (281.14) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 271.42  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 39.43 टक्के एवढी आहे.

***-***

Monday, 11 July 2016

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

जालना- सन 2015-16 या शैक्षणिक वर्षात इयत्त 10 वी, व इयत्ता बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून (60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणारे अर्ज करण्यास पात्र राहतील.) उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
            विद्यार्थी विद्यार्थीनींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादीत,डॉ. बाबासाहेब आंबेडक्रर, सामाजिक न्यायभवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना येथे दि. 15 जुलै 2016 पर्यंत दोन प्रतीत अर्ज सादर करावेत.अर्जासोबत अर्जदाराचा जातीचा दाखल सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा, अर्जदाराचा कुंटूंबाचा उत्पनाचा दाखला, तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा, रेशनकार्ड, आधारकार्ड झेराक्स प्रती, गुणपत्रक, दोन पासपोर्ट फोटो, आणि बोनाफाईड, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती इत्यादी कागदपत्रे सोबत जोडावीत, असे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

***-***

खरीप हंगामातील क्षेत्र नोंदणीच्या तारखा जाहिर

जालना- खरीप हंगामनिहाय क्षेत्र नोंदणीच्या तारखा खालीलप्रमाणे जाहिर झाल्या आहे. पीक, क्षेत्र नांदणीच प्रस्ताव सादर करण्याचा आणि शुल्क भरण्याचा अंतिम दि. मुग, उडीद,25 जुलै ते 31 जुलै 2016, संकरीत/सुधारित कापूस, सोयाबीन, बाजरी, भुईमुग, तुर, मका, ज्युट, ख. ज्वारी दि, 31 जुलै ते 6 ऑग्स्ट 2016, खरिप सुर्यफुल व इतर खरीप पीके दि. 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2016,
               भाजीपाला पीके पेरणीपासुन 15 दिवसाचे आत,चलन प्राप्त झाल्यापासून 6 दिवसाचे आत आणि धान 20 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2016 पेरणीपासून 15 दिवसाच्या आत नोंदणी करावी, असे विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

***-***

जालना जिल्ह्यात 38.86 मि.मी. पावसाची नोंद

जालना- जिल्ह्यात 11 जुलै, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 38.86 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना-47.88 (228.19), बदनापूर-52.20 (208.60), भोकरदन-39.88 (167.64), जाफ्राबाद 40.40 (158.20), परतूर-19.40 (307.80), मंठा- 29.00 (272.00), अंबड-52.86 (311.28) घनसावंगी-29.29 (254.43) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 238.52  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 34.65 टक्के एवढी आहे.

***-***

Wednesday, 6 July 2016

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दानवे कुटुंबियांचे सांत्वन

जालना, दि. 6-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि. 6 जुलै रोजी भोकरदन तालुक्यातील जवखेडा (बु.) येथे दानवे कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देऊन खासदार रावसाहेब  दानवे पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. 
            खासदार रावसाहेब दानवे यांच्या मातोश्री केशरबाई दादाराव पाटील दानवे यांचे वृद्धापकाळाने 5 जुलै रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जवखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दानवे कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी होत कुटुंबातील आमदार संतोष दानवे पाटील, निर्मलाताई दानवे, अप्पासाहेब दानवे पाटील, सुलाबाई तडेकर, आशाबाई मुकेश पांडे, उषा महेश आकात, रंजना हर्षवर्धन जाधव यांच्यासह परिवारातील सर्वच सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन
केशरबाई दादाराव दानवे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.   
            याप्रसंगी  विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  राजकुमार बडोले, गृह राज्यमंत्री राम शिंदे, आमदार सर्वश्री अब्दुल सत्तार, चैनसुख संचेती, नारायण कुचे,अतुल सावे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर  यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार उपस्थित होते.

*******

Tuesday, 5 July 2016

जालना जिल्ह्यात 12.79 मि.मी. पावसाची नोंद

जालना - जिल्ह्यात 5 जुलै, 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 12.79 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
  जालना-14.13 (129.68), बदनापूर-6.20 (104.60), भोकरदन-10.50 (105.01), जाफ्राबाद 16.80 (106.00), परतूर-18.20 (207.60), मंठा- 13.75 (170.00), अंबड-11.71 (161.85) घनसावंगी-11.00 (138.29) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 140.38  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 20.39 टक्के एवढी आहे.

***-***