Wednesday, 10 November 2021

जिल्ह्यात 00 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 00 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 10 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  00  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात  जालना शहर-निरंक , मंठा तालुक्यातील निरंक,परतुर तालुक्यातील निरंक , घनसावंगी तालुक्यातील ,निरंक , अंबड तालुक्यातील  निरंक, अंबड निरंक,  बदनापुर  तालुक्यातील – निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद निरंक, भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील –निरंक अशा प्रकरे आरटीपीसीआरद्वारे 00 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 00 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  66755 असुन  सध्या रुग्णालयात- 9 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14029  दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 462 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-668937 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -0 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61941 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 603066 रिजेक्टेड नमुने-2608, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने- 28 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535344

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 05,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-13050आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-2, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -9 ,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-00, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-60721 सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-25 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1214224 मृतांची संख्या-1195

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  

अ.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

0

61941

डिस्चार्ज

0

60721

मृत्यु

0

1195

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

821

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

374

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

462

389733

पॉझिटिव्ह

0

50823

पॉझिटिव्हीटी रेट

0.0

13.04

रॅपीड अँटीजेन टेस्ट

0

279342

पॉझिटिव्ह

0

11118

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

3.98

एकुण टेस्ट

462

669075

पॉझिटिव्ह

0

61941

पॉझिटिव्ह रेट

0.00

9.26

 

क.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

128940

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

66746

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

21

 होम क्वारंटाईन      

21

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

1214224

हाय रिस्क  

366145

लो रिस्क   

848079

 रिकव्हरी रेट

 

98.03

मृत्युदर

 

1.93

 

ङ  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6249

 

 

अधिग्रहित बेड

9

 

 

उपलब्ध बेड

6240

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

9

 

 

उपलब्ध बेड

946

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1722

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

1722

 

आयसीयु बेड क्षमता

 

402

 

 

अधिग्रहित बेड

5

 

 

उपलब्ध बेड

397

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1879

 

 

अधिग्रहित बेड

1

 

 

उपलब्ध बेड

1878

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

174

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

174

 

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

3572

 

 

 

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

अ.क्र.

जिल्‍हा

                                                           रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

1

जालना

0

0

0

143

0

17

0

0

0

99

0

27

-*-*-*-*-*-*-*-*-

Tuesday, 9 November 2021

शासकीय व खासगी रुग्णालयांच्या फायर व स्ट्रक्चरल ऑडीटचे काम 30 नोव्हेंबरपर्यंत पुर्ण करुन अहवाल सादर करा -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड


 


 

     जालना, दि. 9 (जिमाका) :- सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हा रुग्णालयासह व शासकीय व खासगी रुग्णांलयांच्या फायर व स्ट्रक्चरल ऑडीटचे काम येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश देत या कामामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय अथवा दिरंगाई खपवुन घेतली जाणार नसल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्पष्ट केले.

                जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात फायर ऑडीट संदर्भात आयोजित आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

                यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओमकार चांडक, श्री नागरे, कार्यकारी अभियंता (विद्युत) श्री भोसले यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षकांची उपस्थिती होती.

                जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, अहमदनगर येथील रुग्णालयात नुकतीच अपघाताची घटना घडली आहे.  जालना जिल्ह्यात अशी घटना घडु नये यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातुन  जिल्हा रुग्णालयाच्या फायर ऑडीटचे काम येत्या १० दिवसांमध्ये पुर्ण करण्यात यावे तर उर्वरित रुग्णालयांचे काम 30 नोव्हेंबरपर्यंत पुर्ण करुन अहवाल सादर करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

                प्रत्येक शासकीय व खासगी रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक असुन त्यादृष्टीनेही उपाययोजना करण्यात याव्यात.  त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी आगीची घटना घडल्यास अग्निरोधकाच्या मदतीने आग वीझवण्याबाबतचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

-*-*-*-*-*-*-

जालना शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणे तातडीने काढुन घ्या - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड शहरातील वाहतुक सिग्नल तातडीने सुरु करा पी१ पी२ पार्किंग सुविधेबरोबरच नो हॉकर्स झोन घोषित करा

 



        जालना, दि. 9 (जिमाका) :-    जालना शहरामध्ये बेकायदेशीर असलेली अतिक्रमणे, वाहतुक सिग्नल सुविधा नसणे, रस्त्यावर मोकाट जनावरांचा संचार, पार्किंग सुविधा नसणे या बाबींमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी रस्त्यावरील बेकायदेशिर अतिक्रमणे तातडीने काढुन घेत आवश्यक ठिकाणी वाहतुक सिग्नल सुविधा सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

                जालना शहरातील वाहतुकीच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. राठोड बोलत होते.

                या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओमकार चांडक, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काळे, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक एम.ए. सय्यद, जिल्हा वाहतुक शाखेचे एस.बी. सानप, नगररचना विभागाचे एस.एस. भालेराव, पी.एस. पवार आदींची उपस्थिती होती.

                जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, जालना शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमणे आहेत.  या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी बेकायदेशीर असलेली अतिक्रमणे नगरपालिकेने पोलीस विभागाच्या सहकार्याने तातडीने हटवावीत.  तसेच शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर बसणाऱ्या मोकाट जनावंरामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने नगर परिषदेने कोंडवाड्याची तातडीने दुरुस्ती करुन घेत हा प्रश्न येत्या १५ दिवसांमध्ये मार्गी लावण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिले.

                जालना शहरामध्ये मामाचौक, सुभाष चौक व शनिमंदिर परिसरामध्ये वाहतुक सिग्नल बसवण्यात आलेले आहेत.  परंतु हे वाहतुक सिग्नल बंद अवस्थेमध्ये आहेत.  शहरात वाहतुक सुरळीत होण्याच्यादृष्टीने बंद अवस्थेमध्ये असलेले वाहतुक सिग्नल तातडीने सुरु करण्यात यावेत. त्याचप्रमाणे अंबड चौफुली व मंठा चौफुली या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने या ठिकाणावर नव्याने सिग्नल बसविण्याची कार्यवाही करावी. सिग्नल बसविण्यात आलेल्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, रोडच्या मध्ये रस्ता दुभाजकाचे पांढरे पट्टे यासह आवश्यक ती बाबींसह हे सिग्नल अविरत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

                शहरामध्ये वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नसल्यानेही वाहनांची कोंडी होत असुन यासाठी पी१ पी२ पार्किंग व्यवस्था सुरु करण्यात यावी. शहरामध्ये नो पार्किंग, नो एन्ट्री आदी साईन बोर्ड तातडीने उभारण्यात येऊन पी१ पी२ पार्किंगची कडक अंमलबजावणी होईल, यादृष्टीने नियोजन करण्याबरोबरच शहरामध्ये नो हॉकर्स झोन घोषित करुन सार्वजनिक रस्त्यावरील फळ व ईतरसाहित्य विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करुन देण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

                जालना शहराच्या मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अत्यंत आवश्यकता असुन ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना करत यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे सांगत शहरामध्ये  अनाधिकृतपणे लावण्यात येणाऱे बॅनर, पोस्टर्स तातडीने काढुन टाकण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

-*-*-*-*-*-*-*-

Monday, 1 November 2021

मिशन कवचकुंडल मोहिमेच्या दोन टप्प्यात जिल्ह्यात साडेपाच लाखाहुन अधिक लसीकरण जिल्हा प्रशासनाच्या कामाचे पालकमंत्र्यांकडुन कौतुक लसीकरणाचा वेग कमी न होता जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण होण्यासाठी काटेकोर नियोजन करा - पालकमंत्री राजेश टोपे

 



      जालना दि. 1 (जिमाका):-  कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जिल्ह्यात मिशन कवचकुंडल मोहिमेच्या दोन टप्प्यात जिल्ह्यात साडेपाच लाखापेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असुन ही अत्यंत समाधानाची बाब आहे.  लसीकरणाचा वेग कमी न होता याच पद्धतीने संपुर्ण जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

         जालना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.      

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस, उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, डॉ. जयश्री भुसारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. नार्वेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले,  जिल्ह्यात लसीकरण सुरु झाल्यापासुन केवळ पाच ते दहा हजार लाभार्थ्यांना दैनंदिन लस टोचली जात होती.  परंतु जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातुन लसीकरणाचा आकडा दैनंदिन 30 हजारापर्यंत गेला असुन ही अत्यंत समाधानाची बाब आहे.  जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल तसेच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे हे शक्य होत असुन प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत लसीकरणाची गती कमी होणार नाही यादृष्टीने नियोजन करत येत्या 16 नाव्हेंबर  रोजी संपुर्ण जिल्ह्यात 50 हजार लाभार्थ्यांना लस टोचण्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचनाही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिल्या.

            जिल्हा हा लसीकरणात राज्याच्या तुलनेमध्ये मागे  न राहता राज्याच्या सरासरीच्या पुढे राहील याची काळजी घेत महाविद्यालयांमधुन विशेष कँपचे आयोजन करत विद्यार्थ्यांना लस टोचण्याचे नियोजन करण्यात यावे.  जालना जिल्ह्यात चार गावांमध्ये 100 टक्के लसीकरण पुर्ण करण्यात आले असुन यामध्ये घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, घोन्सीतांडा, बदनापुर तालुक्यातील अंबडगाव तर जाफ्राबाद तालुक्यातील ढोलखेडा   या गावांचा समावेश असुन या गावांनी लसीकरणासाठी केलेल्या कामांची यशकथा तयार करण्यात येऊन इतर गावांना प्रेरणादायी ठरतील अशा पद्धतीने त्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

             आजघडीला जालना जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी कोरोनामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढु नये यासाठी जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्यात यावी.  लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांच्या  चाचण्या करण्यात याव्यात. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींची माहिती पोर्टलवर अपडेट होईल, यादृष्टीनेही काळजी घेण्याच्या सुचना पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केल्या.

            केंद्र शासनाच्या अखत्यारित असेलेले कर्मचारी राज्य बिमा निगम ईएसआयसी हे कामगारांना विविध सेवा, सुविधा देण्याचे काम करते.  ज्या जिल्ह्यामध्ये 30 हजारापेक्षा अधिक कामगारांनी ईएसआयसीमध्ये नोंदणी केलेली आहे अशा ठिकाणी या मजुरांसाठी सर्व सुविधांनीयुक्त असे रुग्णालय उभारण्यात येते.  जालना जिल्ह्यात मोठी औद्योगिक वसाहत असण्याबरोबर जिल्ह्याच्या आठही तालुक्यात 10 पेक्षा अधिक कामगार काम करत असलेल्या अनेक आस्थापना असुन ईएसआयसीचे रुग्णालय जालन्यात व्हावे यासाठी अधिकाधिक कामगारांची नोंदणी करुन घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

*******

 

357 कोटी 13 लक्ष रुपयांचा निधी बँकांकडे वर्ग अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मदतीची रक्कम दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा - पालकमंत्री राजेश टोपे

 



            जालना,दि. 1 – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणुन जालना जिल्ह्यासाठी  425 कोटी 7 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन त्यापैकी 357 कोटी 13 लक्ष रुपयांचा निधी विविध बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे.  हा निधी येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी बँकांना दिले आहेत.

            जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिक, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची मदत म्हणुन  शासनाकडुन निधी प्राप्त झाला असुन प्राप्त झालेल्या निधीपैकी 84 टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी बँकांना वितरित करण्यात आला असुन उर्वरित निधीही तातडीने बँकांकडे वर्ग करत दिवाळपुर्वी हा निधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालाच पाहिजे, याबाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई खपवुन घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत जमा होईल, यादृष्टीने आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

बँकांकडे वर्ग करण्यात आलेला निधी

            जालना तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या निधीपैकी 68 कोटी 3 लक्ष रुपयांचा निधी बँकेकडे वर्ग करण्यात आला आहे तर बदनापुर 34 कोटी 52 लक्ष, भोकरदन-44 कोटी 58 लक्ष, जाफ्राबाद- 23 कोटी 74 लक्ष, परतुर-35 कोटी 48 लक्ष, मंठा-38 कोटी 38 लक्ष, अंबड-59 लक्ष 63 हजार तर घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 52 कोटी 72 लक्ष रुपयांचा निधी बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे.

*******