Thursday, 3 September 2020

जिल्ह्यात 151 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 275 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

                          

 

      जालना दि.3 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड  केअरर सेंटरमधील 275 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर जालना शहरातील चौधरी नगर -2, पेन्शनपुरा -3, इंदिरा नगर-7, सिव्हील हॉस्पीटल-1, नरीमान नगर -5, छत्रपती कॉलनी -2, रामनगर -2,लक्कडकोट -1, मधुबन कॉलनी-1, म्हाडा कॉलनी -1, शनिमंदिर -2,तपोवन -2, फत्तेपुर -5, खंडाळा -1, कोठा जहागीर-1, भोकरदन -3, सिरसगांव -1,कारला -1,पिंपळगांव-4, तिर्थपुरी -2, घनसावंगी -2, अरगडे गव्हाण-4, पिंपरखेड-1, राजेवाडी -3, वाघाळा -1, मंठा-1, सोनदेव-3,पिंपळवाडी-1,माहोरा -1, शहागड -1, सिंदखेडराजा-4, जायकवाडी -1, देऊळगांव राजा-1, अंबड-2, फुलबाजार -1, इंदेवाडी -1, अकोला देव -1,  नानेगांव -1, जयभवानी कॉलनी परतुर-7, द्रौपदानगरी परतुर-3, चिंचोली सांगळे-1, एमआयडीसी-1, ढोरपुरा-1, भोकरदन -1, रानमळा -1, ढगी-1, सिनगांव जि. हिंगोली-1, अकोला बदनापुर -1, निमागांव-1, वसुंधरा नगर-6, वरखेडी -1, लक्ष्मीनगर -1, नळगल्ली-1, जवसगांव -1, तिर्थपुरी -1  अशा प्रकारे RT-PCR तपासणीव्‍दारे 107 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 44 व्यक्तींचा अशा एकुण 151 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

 

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-11209 असुन  सध्या रुग्णालयात-257 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3992, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-366, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-36284 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-151 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5088 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-30594, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-502, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3599

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-28, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3514 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-177, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-479, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-56, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-257, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-60, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-275, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3871, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1067 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-54189 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 150 एवढी आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात  सेवली नेर येथील 42 वर्षीय पुरुष, मुरमा ता. घनसावंगी येथील 45 वर्षीय पुरुष अशा एकुण  दोन  कोरोना बाधित  रुग्णांचा  मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

 

  आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 479 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-44, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-13, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -15, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-29, पोलीस प्रशिक्षण केंद्र-67,मॉडेल स्कूल परतुर-10, के.जी.बी.व्ही.परतुर-14, के.जी.बी.व्ही. मंठा-30,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-28,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-51, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-29, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-70,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-16, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-31,शासकीय मुलांचे वसतिगृह, भोकरदन-5, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -4, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-23

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 18 नागरीकांकडुन  3 हजार 300 तर आजपर्यंत जिल्‍ह्यातील आठही तालुक्‍यात मास्‍क न वापरणे , सोशल डिस्‍टंसिंगच्‍या नियमाचे पालन न करणा-या एकुण  4 हजार 507 नागरीकांकडुन 9 लाख 53  हजार 760  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

                                                               -*-*-*-*-*-*-

 

Wednesday, 2 September 2020

जिल्ह्यात 129 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 93 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


      जालना दि.2 (जिमाका) :- जालना शहरातील दर्गावेस -1, नुतन वसाहत -4, रामनगर -1, खाजगी रुग्णालय -1, समर्थ नगर -2, अंबड चौफुली -1,काद्राबाद -3, अग्रसेन नगर-1, लक्ष्मीकांत नगर-1, नळगल्ली 1, जालना शहर -3, सिंधी बाजार -1, राजर्षी शाहुनगर-1, अंबड रोड -1, ढवळेश्वर -1, तुळजाभवानी नगर -1, श्रीकृष्ण नगर -2, संभाजी नगर-5, श्रीकृष्ण रुख्मिणी नगर-1, मोदीखाना-2,गायत्रीनगर-2,रुख्मिणी नगर -1, दावलवाडी -2,एस.आर.पी.एफ. -1, जुना जालना -1, कपुर कॉलनी मानवत -2, परतुर -2, काकडे कंडारी -1, बीबी-1, रेल्वे निवासस्थान-1, मांडवा -1, राजपुतवाडी -1, रोहिना-1, चंदनझिरा -1, किनगांव -1, मेहकर -1, अंबड -1, ढाकलगांव-1,चिखली-1, मंठा -2, देऊळगांवराजा-2, वाटुर-3, नेर-2, पारडगांव -1, धानोरा-1, सुखापुरी -1, विडोळी -1, खळेगांव -1, देवठाणा -1,  शेलगांव -2, लोणार-2, सेलुद -3, बदनापुर -2, चांगले नगर  अंबड -2,जाफ्राबाद -4, शहागड -2, वालसावंगी -2, सायगांव -1, शेवली नेर-1, अशा एकूण 93 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील चमडा बाजार -1, मुस्तफा मस्जीद -1, मोरंडी मोहल्ला-1, जिल्हा महिला रुग्णालय-1, मोदीखाना -1, तट्टुपुरा -1, दुर्गामाता रोड -1, समर्थ नगर -1, नुतनवसाहत -1, सोनल नगर -1, पोलीस मुख्यालय-1, गांधी चमन  माळीपुरा-1,  भाग्यनगर -1, आनंदस्वामी गल्ली -1, शंकरनगर -1, पांगारकर नगर-1, लक्कडकोट -1,सकलेचा नगर-6, संभाजी नगर -1, बोलेगांव -1, घनसावंगी -1, सिध्देश्वर पिंपळगांव-6, वरुडी-1, सरांबा -1, बदनापुर-3, नागेवाडी -1, रांजणी-3, भारज-5, जालना शहर -2, पोलीस स्टेशन जाफ्राबाद-2, चिकनगांव -1, शिक्षक कॉलनी अंबड -1, कैलास नगर अंबड-1, धाईत नगर अंबड -1, चांगले नगर अंबड-1, शेवली -1, हस्तपोखरी-1, देऊळगांव -1, खांडवी -1, माळीपुरा देऊळगांव राजा -1, लोणार -1, मेहकर -4, वाकुळणी-2, दाभाडी-1, गोकुळवाडी-1, झोपडपट्टी बदनापुर-1, रानमाळा-3, शिरपुर-1, पोलीस स्टेशन मंठा -1, तांदुळवाडी -1, वर्दडी ता. सिंदखेडराजा-4, देऊळगांव राजा -2, तपोवन -2 अशा प्रकारे RT-PCR तपासणीव्‍दारे 84 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 45 व्यक्तींचा अशा एकुण 129 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-10795 असुन  सध्या रुग्णालयात-249 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3936, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-372, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-34345एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-129 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-4937 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-29891, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-417, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3360

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3486 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-107, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-372,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-55, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-249, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-54, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-93 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3596, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1193 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-53935तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 148 एवढी आहे.

 

  आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 372 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-42, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-13,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक -22, मॉडेल स्कूल परतुर-1, के.जी.बी.व्ही.परतुर-15, के.जी.बी.व्ही. मंठा-31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-26, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-23, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-69,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी-29, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-23, शासकीय मुलांचे वसतिगृह, भोकरदन-12, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-6, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -11, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-18

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 25 नागरीकांकडुन  4 हजार 400 तर आजपर्यंत जिल्‍ह्यातील आठही तालुक्‍यात मास्‍क न वापरणे , सोशल डिस्‍टंसिंगच्‍या नियमाचे पालन न करणा-या एकुण  4 हजार 489 नागरीकांकडुन 9 लाख 50  हजार  460  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

                                                               -*-*-*-*-*-*-

 

Tuesday, 1 September 2020

जिल्ह्यात 97 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 94 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

      जालना दि.  1 (जिमाका) :- जालना शहरातील अग्रेसन नगर -1, संजय नगर -1, भाजी मंडई -1, नारायणदादा चौक -1, मिशन हॉस्पीटल  परिसर -1, जालना शहर -4, संभाजी नगर -1, रामनगर  ख्रिस्त कॅम्प -1, कॉलेज रोड -1, मोदीखाना -1, जयभवानी नगर-1, हनुमानघाट -1, चौधरी नगर -1, शंकर नगर -1, सोनल नगर -2, आनंद नगर-1, जमुना नगर 1, कांचन नगर -1, शांकुतल नगर -1, ऋषिपार्क -1, खाजगी हॉस्पिटल -10, नरेश कॉम्प्लेक्स-1, सोरटी नगर -1, गणेश नगर-1, नुतन वसाहत-1, म्हाडा कॉलनी -1, कन्हैया नगर-1, भाग्यनगर -1, गेवराई -1, दुधना काळेगाव -1, रामेश्वर गल्ली परतुर-2,वाघाळा ता. मंठा-2, मंठा-2, भीलपुरी -5, धोपटेश्वर -1, बदनापुर -2, चिखली -2, ढोकसाळ 1, चिखली जि. बुलढाणा-1, लोणार -1, त्रिंबकनगर देऊळगावराजा-1, मत्सोदरी कॉलनी अंबड-1, मेसखेडा-1, नागेवाडी -6, कथला-1, आझाद नगर लोणार -1, बागवान कॉलनी देऊळगावराजा -1, विहामांडवा -1, साडेसावंगी -2, असोला -2, देऊळगावराजा-3, परतुर-1, धमधम -1, ठाकुर नगर, अंबड -1, आनंदवाडी -1, बदनापुर -1, चांगले नगर, अंबड -1, तांदुळवाडी -1, मेरा -2, धोडप ता. रिसोड -1, भाटेपुरी -1, उंबरखेड -1, अशा एकूण 94 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील पोलीस मुख्यालय -1, साईनगर -1, मधुबन कॉलनी -1, जालना शहर -1,घायाळनगर -1, आनंदस्वामी गल्ली -1, रामनगर ढोरपुरा -1, अयोध्या नगर-1,जिल्हा महिला रुग्णालय-2, लक्कडकोट-2, अंबड-1, कुंभारगल्ली -1, सोनल नगर -1,टेंभुर्णी-1, देऊळगावराजा-1, टाकरवन -1, जामवाडी -3, घोटण-1, मांडवा-3, शेवगांव -1, घनसावंगी-1, चंदनझिरा-1, पिंपळवाडी -1, मेहकर -1, राजुर-2, वाघ्रुळ-2, कंडारी बु. -4, दुसरबीड -1, मंठा -1, गोंदेगाव -1, बठाण -2, सिंदखेडराजा -1, सकलेचा नगर -2, अंबड -1, निलम नगर -1, रांजणी -1, घनसावंगी -1, बालाजी नगर भोकरदन -1 अशा प्रकारे RT-PCR तपासणीव्‍दारे 51 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 46 व्यक्तींचा अशा एकुण 97 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-10591 असुन  सध्या रुग्णालयात-238 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3875, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-248, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-34504 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-97 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-4808 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-29239, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-357, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3269

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -23, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3455 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-49 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-324,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-59, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-238,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-56,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-94 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3503, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -1157 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-51958तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 148 एवढी आहे.

    आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात  जालना शहरातील शाकुंतलनगर येथील 75 वर्षीय पुरुष, आखा ता. परतुर येथील 65 वर्षीय महिला, घनसावंगी येथील 55 वर्षीय पुरुष, शेरसवार नगर येथील 90 वर्षीय पुरुष, मेहकर जि. बुलढाणा येथील 54 वर्षीय महिला, खाजगी रुग्णालयातील 68 वर्षीय महिला, जुना जालना परिसरातील 75 वर्षीय पुरुष, टेलिकॉम कॉलनी, जालना येथील 61 वर्षीय महिला, साईनगर येथील 63 वर्षीय पुरुष अशा एकुण  नऊ  कोरोना बाधित  रुग्णांचा  मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

  आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 324 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-34, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-13,वन प्रशिक्षण केंद्र वस्‍तीगृह-4,    मॉडेल स्कूल परतुर-22, के.जी.बी.व्ही.परतुर-15, के.जी.बी.व्ही. मंठा-27, मॉडेल स्कूल मंठा-22, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-21, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-5, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-28,             डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-47, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी-15, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-24, शासकीय मुलांचे वसतिगृह, भोकरदन -12, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-5, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -12, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-18

 

 जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 13 नागरीकांकडुन  2 हजार 250  तर आजपर्यंत जिल्‍ह्यातील आठही तालुक्‍यात मास्‍क न वापरणे , सोशल डिस्‍टंसिंगच्‍या नियमाचे पालन न करणा-या एकुण  4 हजार 464 नागरीकांकडुन 9 लाख 46  हजार  60  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

                                                               -*-*-*-*-*-*-

एम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत सहाव्या आठवड्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव

 



            जालना दि. 1 (जिमाका) :- कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कोव्हीड रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सेवक व सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आलेल्या एम्प्लॉई ऑफ वीक उपक्रमांतर्गत सहाव्या आठवड्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोव्हीड योद्धयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या हस्ते  रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. आज रोजीची बक्षिसाची रक्कम निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.  यावेळी  उपजिल्हाधिकारी(रोहयो)  रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी भुसंपादन गणेश नि-हाळे,  डॉ. संतोष कडले, उपस्थित होते.

            यामध्ये उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया पवार यांना चार हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर उत्कृष्ट  स्टाफ नर्स श्रीमती अर्चना हस्तक यांना तीन हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र,  उत्कृष्ट परिचर सुरज ढिलपे यांना एक हजार पाचशे रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र तर उत्कृष्ट परिचारीका श्रीमती उजमा पठाण यांना एक हजार पाचशे रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

    पहिल्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी स्वत: दिली होती तर दुसऱ्या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम डॉ. संजय जगताप, तिस-या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी दिली, चौथ्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , पाचव्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर यांनी दिली. 

*-*-*-*-*-*-*