Friday, 3 July 2020

जालना जिल्हयातील खाजगी आस्थापनांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा जालना जिल्हयातील खाजगी आस्थापनांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्या करीता रिक्तपदे अधिसुचित करण्याचे आवाहन.

जालना दि,3:- (जिमाका) जिल्ह्यातील  सर्व खाजगी  आस्थापनांनकोरोना   COVID 19 मुळे आपल्या जिल्हयातून कुशल/अकुशल कामगारांचे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे आपल्याआस्थापनेमध्ये कुशल/अकुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,जालना यांच्या मार्फतदि. 6 व 7 जुलै 2020  या दोनदिवशी सकाळी 10 ते सांयकांळी 6:00 या वेळेत  ऑन लाईन रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
त्यासाठी प्रथम आपल्याकडे हवे असलेले  कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती या विभागाचे वेबपोर्टल www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नोटीफाइड कराव तसेच ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये आपण अधिसुचित पदांना बेरोजगार उमेदंवार On Line Apply करतील त्याची  आपण आपल्या  स्तरावर यादी प्राप्त करुन त्यांचा दुरध्वनी द्वारे अथवा  Video Calling द्वारे मुलाखत  घेवूननिवड करुन रुजु करुन घ्यावे उमेदवारांचा रुजू अहवाल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयास पाठवावा. ज्या आस्थापनांना या वेब पोर्टलवररिक्तपदे अपलोड करता येत नसतील त्यांनी या संदेशाबरोबर पाठविण्यात येणा-या नोटीफीकेशन फॉर्ममध्ये माहीती भरुन मेल आयडी jalnarojgar@gmail.com. दिनांक 05 जुलै 2020 पर्यंत पाठवावी.

ज्या आस्थापनांची या पुर्वी उपरोक्त वेबपोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली नाही  त्यांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नवीन नोंदणी करावी  आपल्याकडील रिक्तपदे   अधीसुचित करावी. नवीन नोंदणी करतांना उपरोक्त वेबपोर्टलवर EMPLOYER (LIST A JOB)  या  ऑप्शनचा  वापर करुन आपल्या आस्थापनेची नोंदणी करावी. नवीन नोदणी करताना  आपले व्यवसाय सुरु करण्याबाबचे प्रमाणपत्र  (Incorporation Certificate ) नोंदणी मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. वेबपोर्टलद्वारे आपल्या आस्थापनेची  नवीन नोदंणी करणे किंवारिक्तपदे   अधीसुचित करणे  आपणास  शक्य नसल्यास सोबत जोडलेल्या फॉर्म्समध्ये  आपल्या आस्थापनेची  माहीती भरुन व्यवसाय सुरु करणे बाबतच्या प्रमाणपत्रासह या कार्यालयाच्या ई मेल आयडी jalnarojgar@gmail.comवर दिनांक 5 जुलै 2020  पर्यंत पाठवावीवेब पोर्टलवर  नवीन नोंदणी  करणे  पदे अधीसुचित करणे  या संदर्भास आपणांस काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02482 - 225504 वर संपर्क साधवा, असे आवाहन  सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार  उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,जालना यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे केले आहे.                                              *******  

ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार, नोकरीची सूवर्णसंधी



          जालना दि.3 - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अंतर्गत पहिला ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 6 व 7 जूलै 2020 रोजी  आयोजीत  करण्यात आलेला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
            या रोजगार मेळाव्यामध्ये L&T CONSTRUCTION SKILLS TRAINING INSTITUTE, PANVEL                          ( MUMBAI ),  GLOBAL REACH SKILL TRAINING INDIA PVT LTD, TRAHO LIVELIHOOD MISSION PVT.LTD, TISYA BUILDING PRODUCTS PVT LTD, Favorata Industries, Aurangabad, NRB BEARINGS LIMITED, आदी कंपनीद्वारे  विविध पदांकरिता पदे अधिसूचित करण्यात आलेली असून सुशिशित बेरोजगारांनी https://www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर स्वत:चा युझरआयडी व पासवर्ड वापरून जिल्हा रोजगार मेळावा या टैब मध्ये अधिसूचित रिक्तपदे तपासून पदाच्या पात्रतेप्रमाणे या मेळावामध्ये सहभाग नोंदवावा. मेळावा ऑनलाईन होणार असून Skype,Whatsapp, तसेच  video call व फोनेद्वारे मुलाखत घेवून निवड प्रकिया होणार आहे.जिह्यातील इच्छुक व सदर पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
            जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालनामॉडेल करिअर सेंटर (श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार)  यांच्या सयुक्त विद्यमाने दिनाक 6 जूलै 2020 रोजी दूपारी 12.00 वाजता बेरोजगारा करिता ऑन लाईन वेबिनार च्या माध्यमातून समुपदेशन व करिअर गायडंस सत्राचे आयोजन  to Get Join Zoom Meeting ID & Password पुढील लिंकवर संपर्क करावा.            
या ऑनलाईन समुपदेशन व करिअर गायडंस सत्रामध्ये 'कॅम्पस टू कॉर्पोरेट - कोविड -19 प्रादुर्भाव नतर रोजगारासाठी  तयारी करण्याचा मार्ग' यावर डॉ अनिल जाधव, युवा व्यावसायिक, राष्ट्रीय करिअर सेवा, कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकार हे मार्गदर्शन करणार असून खालील विषयाचा अंतर्भाव या सत्रात असणार आहे.  आपण आणि आपला जॉब आपल्याला का समजला पाहिजे, यशस्वी कारकीर्द बनविण्यासाठी      नियोजनाची पायरी, निवड प्रक्रियेतील  पाय-या, आपली तयारीः स्क्रीनिंग आणि शॉर्टलिस्टिंग करण्यापूर्वी रेझ्युमेद्वारे चाचणी , गट चर्चा , मुलाखत , मुलाखतीत सामान्यत: विचारले जाणारे प्रश्न , पार्श्वभूमी इत्यादी महाराष्ट्र शासन यांच्या https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी व  जास्तीत जास्त बेरोजगारानी समुपदेशन व करिअर गायउन्स  सत्रामध्ये व रोजगार मेळावा सहभाग नोंदवावा. समुपदेशन व करिअर गायडंस सत्रा बाबत अधिक माहिती करिता  डॉ अनिल जाधव, युवा व्यावसायिक, राष्ट्रीय करिअर सेवा, कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकार मोबाईल क्रमांक 9423209494पहिला ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा करिता या कार्यालयाचा फोन क्रमांक ( 02482) 225504  वर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशलय विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-*

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जालना शहरामध्ये 5 जुलैपासुन लॉकडाऊन -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे



            जालना, दि. 3 -  जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असुन बाधितांची अधिक संख्या जालना शहरामध्ये आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखून विषाणुची साखळी तोडण्यासाठी पदाधिकारी, प्रशासन व जनता यांनी एकत्रित येऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.  त्याअनुषंगाने रविवार दि. 5 जुलै, 2020 रोजी रात्री 12-00 वाजेपासुन संपुर्ण जालना शहरामध्ये 10 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नगरपालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेत्याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
            यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्यासह नगरपालिकेचे सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेतपरंतु वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सुचना तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनुसार जालना शहरामध्ये 10 दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी सर्व पदाधिकारी व जनतेचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. समाजातील प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे असुन विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरू नयेपल्स ऑक्सीमीटरच्या नियमित वापरामुळे आपल्याला शरीरातील एसपीओ२ तसेच ब्लड सॅच्युरेशनचे प्रमाण कळत असल्याने आपण स्वत: याचा नियमित वापर करत असल्याचे सांगत या ऑक्सीमीटरचा वापर करुन प्रत्येक नागरिक घरातल्या घरात तपासणी करु शकतो.  94 पेक्षा लेव्हल कमी असेल व आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप यासारखी लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयास संपर्क साधल्यास तातडीने उपचार करणे सोईचे होत असल्याने प्रत्येकाने याचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
               जालना शहरामध्ये प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहेलॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या प्रभागातील एकही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरणार नाही याची समितीने दक्षता घ्यावीप्रभागामध्ये जनतेला आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठीही समितीने आवश्यक ती मदत करावी. यासाठी समितीला प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईलतसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये जनतेला वैद्यकीय सेवेची आवश्यकता असल्यास डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शनची समिती मार्फत तपासणी करुनच यासाठी सुट दिली जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. 
               जालना शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये ज्यांना मधुमेह, ऱ्हदयविकार यासारखे आजार असतील अशा वयोवृद्ध व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असुन सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना समितीने आवश्यक ते सहकार्य करावे.  कोरोनाबाधितांचा अहवाल त्वरित देणाऱ्या अँटीजेन टेस्टसाठी 50 हजार किटसची मागणी नोंदविण्यात आलेली असुन या किटस उपलब्ध झाल्यास त्यामार्फतही तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
               येत्या ५ जुलैपासुन जालना शहरामध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असुन नागरिकांना जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे.  नागरिकांनी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता तसेच सामाजिक अंतराचे पालन करुनच खरेदी करावी.  लॉकडाऊनच्या काळात कोणीही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज असुन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले. 
               आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले,  गेल्या शंभर दिवसापेक्षा अधिक कालावधीपासुन लोकप्रतिनिधी, वैद्यकीय, पोलीस तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी काम करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन जालना शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगरपालिकेतील सर्व पदाधिकारी प्रशासनाच्यासोबत आहेत.  नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये.  लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व वस्तु नगरसेवक व त्यांच्या समितीमार्फत त्यांना पोहोच करण्यात येणार असल्याचे सांगत ज्या प्रभागामध्ये उत्कृष्ट काम करण्यात येईल, अशा नगरसेवकाला त्यांच्या वार्डाचा विकास करण्यासाठी आमदार निधीमधुन २० लक्ष रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी  यावेळी सांगितले.
               नगराध्यक्षा श्रीमती गोरंट्याल म्हणाल्या, सर्वानुमते घेण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अत्यंत महत्वपुर्ण असुन विषाणुची साखळी तोडुन जालना शहर कोरोनामुक्त करण्यासाठी नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
               बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्व नगरसेवकांचे म्हणणे सभागृहाने ऐकले. यात सर्वात किमान १० दिवस कडक लॉकडाऊन करण्याविषयी आग्रही भुमिका नगरसेवकांनी मांडली.

*******  

Thursday, 2 July 2020

जिल्ह्यात 39 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 8 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



            जालना, दि. 2 (जिमाका) :-  जालना शहरातील राज्य राखीव  पोलिस दलातील 1 जवान, मोदीखाना येथील 1 , तेली समाज रामनगर गल्ली 1, कालीपुरी शनिमंदीर  1, मंगळबाजार 1, वैभव कॉलनी 1, भाटेपुरी ता. जालना 1, कुरेशी मोहल्ला ता. भोकरदन शहर येथील 1, अशा एकुण 08 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात  आला तर जालना शहरातील तलरेजानगर 15, रुक्मीणीनगर 03, गुरुगोविंदसिंग नगर 01, भोलेश्वर नगर 01, इन्कमटॅक्स कॉलनी 01, कुरेशी मोहल्ला 01, वसुंधरानगर 01, लक्ष्मीकांतनगर 01 मोदीखाना 03, दु:खीनगर 01, नाथबाबा गल्ली 02, पोस्टऑफीस रोड 01, अग्रेसन नगर 01, बरवार गल्ली 01, मजरेवाडी ता. जालना 01, दरेगाव          ता. जालना 01, घनसावंगी शहर 02, गारखेड ता. सिंदखेडराजा 01, देऊळगावराजा जि. बुलढाणा 01, अशा एकुण 39 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
            देऊळगाव राजा जि.बुलढाणा येथील संजय नगर परिसरातील रहिवासी असलेल्या साठ वर्षीय पुरुष रुग्णास मागील दोन वर्षापासुन हृदयाविकाराचा त्रास होता. न्युमोनियाचा त्रास होत असल्याने दि. 1 जुलै, 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु दि.1 जुलै, 2020 रोजी झाला. त्यांच्या स्बॅबचा अहवाल दि. 2 जुलै 2020 रोजी प्रयोगशाळेकडुन पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण4300 असुन  सध्या रुग्णालयात-188, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1664 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या141, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5514 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने39 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-620 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4736 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-413 एकुण प्रलंबित नमुने-154, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1457.
            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती18, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 1318, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-314, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-314, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-23, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-188,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-38, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-08, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-368, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-208 तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-25, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-14074, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 19 एवढी आहे. 
          आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 314 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -04,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-41, संत रामदास वसतिगृह जालना-40, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-31, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-32,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-31,मॉडेल स्कूल परतुर-11, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय परतुर-03,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-31, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-15,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, मुलांचे शासकीय वसतीगृह भोकरदन-17,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-16, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह ईमारत क्र.2 भोकरदन-22, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-16,
       

        लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 900   गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 829 वाहने जप्त,  आय.पी.सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 81 हजार 300, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  4 लाख 76 हजार 830 असा  एकुण 5 लाख 4 हजार 938 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
*******

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा




        जालना, दि. 2 – गोदावरी नदीवर पैठण धरणातील आपेगाव, हिरपुडी ता. पैठण, जोगलादेवी, मंगरुळ, राजाटाकळी (शिवनगाव) ता. घनसावंगी आणि लोणीसावंगी ता. परतुर हे सहा उच्चपातळी बंधारे आहेत. सद्यस्थितीत काही बंधाऱ्यांमध्ये 70-75 टक्के पाणीसाठा झाला आहे.  जर पाणलोट क्षेत्रामध्ये जोराचा पाऊस होऊन Flash Flood झाल्यास अंत्यंत कमी कालावधीत बंधारा 90 टक्यावर जाऊन त्यावेळेस पाण्याचा विसर्ग हा निम्नबाजुस दरवाजे उचलुन बाहेर सोडावा लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता, जायकवाडी विभाग, पैठण यांनी कळविले आहे. त्यानुसार नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांनी सतर्क रहावे, चलमालमत्ता, चीजवस्तु, वाहने, जनावरे, पाळीवप्राणी, शेती अवजारे आदी साधनसामग्री सुरक्षितस्थळी हलविण्यात यावी.  तसेच धरणाच्या खालील नदी काठावरील नागरी भागामध्ये सुरक्षिततेच्यादृष्टीने नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पुर विसर्गाबाबत गांभीर्य लक्षत घेता जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्याबरोबरच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी संबंधित क्षेत्रातील उप विभागीय अधिकारी तसेच तहसिलदारांना एका पत्राद्वारे दिले आहेत.
*******



क्रेडाईतर्फे अकुशल व बेरोजगारांसाठी दोन महिन्यांच्या मोफत प्रशिक्षणाचे आयोजन प्रशिक्षणादरम्यान दरमहा 10 हजार रुपये मानधन इच्छुकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


            जालना, दि. 2 -  बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेने आत्मनिर्भर व कुशल बांधकाम कामगार वर्ग घडविण्यासाठी कुशलता अभियानास सुरुवात केलेली आहेया अभियानांतर्गत पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व 18 वर्षावरील अकुशल व बेरोजगार तरुण, स्त्री व पुरुषांना अनुभवी प्रशिक्षकांकडून ज्या ठिकाणी बांधकाम सुरु आहे तेथेच दोन महिन्यांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.  यामध्ये मेसनरी, बार बेंडीग आणि स्टील फिक्सिंग, शटरिंग, कार्पेन्टरी, इमारत रंगकाम, प्लम्बिंग, टाईलिंग आणि इलेक्ट्रीकल टेक्निशियन या शाखांमध्ये प्रामुख्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थींची मोफत निवासाची व्यवस्था करण्याबरोबरच १० हजार रुपये मानधन म्हणून दिले जाणार आहे उत्तीर्ण झालेल्या मजुरांना प्रशिक्षण समाप्त होताच पुण्यात अथवा पुण्याच्याआसपास असलेल्या प्रकल्पावर नोकरीही दिली जाणार आहे  रुजू झालेल्या ठिकाणी किमान एक वर्ष कामगाराला काम करावे लागणार आहे.  प्रशिक्षणानंतर अकुशल व बेरोजगार युवा व युवती कुशल कामगार म्हणून बांधकाम क्षेत्रात काम करु शकतात
            जालना जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या अकुशल व बेरोजगार तरुण, स्त्री व पुरुषांनी या प्रशिक्षणासाठी 8390902500,9767645589 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली माहिती https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeRHDiH5HxwtWD2QYRJTYIz3SEt6FpIlizh7zQtznEsIdFymQ/viewform?usp=sf_link या गुगल लिंकद्वारे भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
*******