जालना दि.16 (जिमाका): भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये
अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेण्यासाठी
छात्रपर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे कालावधी CDS कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात येत आहे.
कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.
जिल्ह्यातील इच्छुक
उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,
जालना येथे दि. 5 जुन 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस
येतेवेळी त्यांनी
Department of Sainik Welfare,Pune (DSW)
यांच्या वेबसाईटवर सर्च करुन कोर्ससाठी किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने
प्रिंट दिलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण
भरुन सोबत घेऊन यावे.
सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी
खाली नमुद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण
वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत.
उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर
असावा.
उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली
यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. या परिक्षेकरीता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला
असावा.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी,
छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या ईमेल आय डी व दुरध्वनी क्रमांक
0253 -2451032 किंवा व्हॉट्सॲप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा
दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment