जालना, जिमाका, दि.28 :
बदनापूर तालूक्यातील रोषणगाव महसूल मंडळात काल
झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण
पांचाळ आणि बदनापूर-अंबड विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी प्रत्यक्ष पाहणी
केली. यावेळी तालुका कृषि अधिकारी श्री. गोपाल गुजर, प्र. तहसिलदार श्री. तायडे
आदींची उपस्थिती होती.
यावेळी
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि बदनापूर-अंबड विधानसभेचे आमदार नारायण कुचे
यांनी मौजे. बाजार वाहेगाव येथील शेतकरी नवनाथ भिमराव लांडगे यांच्या शेतातील
अतिवृष्टीने ढासळलेल्या विहीरीची पाहणी केली. तसेच बाजार वाहेगावातील नदीला
आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची देखील पाहणी केली. तसेच मौजे वाकुळणी येथील
शेतकरी गणेश सुदामराव कोळकर यांच्या नुकसानग्रस्त डाळींब बागेची पाहणी केली. तसेच
कडोळी येथील नाल्याची देखील पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी
तहसिलदार बदनापूर आणि तालुका कृषि अधिकारी बदनापूर यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करुन
अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच आमदार नारायण कुचे यांनी अतिवृष्टीने
बाधित सर्व शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत शासनाकडुन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन
दिले. तसेच अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून
तरतुद करण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी महसुल आणि कृषि विभागाचे
अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment