जालना दि.16 (जिमाका): तांत्रिक पदवीधर शाखेच्या विद्यार्थ्यांना
भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. भारतीय सैन्यात तांत्रिक पदवीधर
अभ्यासक्रम (TGC-142) साठी भरती प्रक्रिया होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्यास
उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार
आहे.
या भरतीसाठी फक्त अविवाहित पुरुष
उमेदवार पात्र असणार आहेत. जे अभियांत्रिकी पदवीधर आहेत किंवा अंतिम वर्षात शिकत आहेत.
या पदांसाठी वयोमर्यादा ही 20 ते 27 वर्षे (ज्यांचा जन्म 2 जानेवारी, 1999 ते 1 जानेवारी,
2006 दरम्यान झाला आहे.) दरम्यान आहे. बी.ई. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा बी.टेक
पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, पदवी अधिसूचनेत नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखांमध्येच
असावी. बी.ई./बी.टेक किंवा शेवटच्या वर्षात असलेले अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करु
शकतात.
इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या
अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन आपलललल ऑनलाइन अर्ज सादर
करावा. यासाठी नोंदणीची शेवटची तारीख 29 मे, 2025 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटची मदत घ्यावी, असे अवाहन
सैना भरती कार्यालय, औरंगाबाद यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment