जालना, दि.23 (जिमाका)
:- राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16
जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका
2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023
चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जालना महानगरपालिका कार्यक्षेत्रातील
धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती
पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात
आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 1111 दि. 23 डिसेंबर, 2025
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025
मोटारगाड्या,
वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध
जालना, दि.23 (जिमाका) :- राज्य निवडणूक
आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका
सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. भारतीय
नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा
वापर करुन जालना महानगरपालिका निवडणूक प्रचारफेरी/ मिरवणुकामध्ये जास्तीत जास्त 10
वाहने वापरता येतील. त्यापेक्षा जास्त वाहने वापरण्यास महानगरपालिका क्षेत्रामध्ये
निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश
जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 1112 दि. 23 डिसेंबर, 2025
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025
ध्वनीक्षेपकाच्या
वापरावर निर्बंध
जालना, दि.23 (जिमाका) :- राज्य निवडणूक
आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली
आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ मधील प्राप्त
अधिकारानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे
वापरावर विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल
यांनी जारी केले आहेत.
ध्वनीक्षेपकाचा
वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6.00 वाजण्यापुर्वी
आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर व कोणत्याही क्षेत्रात
ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी
ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावा. ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह
फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल.सर्व राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार आणि इतर
व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची
माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस
कळविणे बंधनकारक राहील. सदरचे आदेश हे जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक
स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये
निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले
आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 1113 दि. 23 डिसेंबर, 2025
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025
वाहनांवर
पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणेवर निर्बंध
जालना, दि.23 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोगाने
दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका
सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. भारतीय
नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा
वापर करुन जालना महानगरपालिका क्षेत्रामध्ये पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे
लावण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल
यांनी जारी केले आहेत.
प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष
प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार
नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. सदर
वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने
लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. सदर वाहनांवर लावावयाचा
पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व
उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी
यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर
लावता येणार नाही. असेही आदेशात नमुद केले आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 1113 दि. 23 डिसेंबर, 2025
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025
सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर,
रहदारीस अडथळा निर्माण करण्यास निर्बंध
जालना, दि.23 (जिमाका)
:- राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16
जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका
2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. महाराष्ट्र
पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जालना
महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर
रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण
होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी
जारी केले आहेत.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 1113 दि. 23 डिसेंबर, 2025
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025
खाजगी
व्यक्तींच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे,
भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध
जालना, दि.23 (जिमाका) :- राज्य निवडणूक
आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका
सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. जालना
महानगरपालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार
पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे
प्रतिनिधी किंवा त्यांचे हितचिंतक यांना निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या
काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे आदिसाठी
कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाची
परवानगीशिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध
घालण्याची आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले
आहेत.
-*-*-*-*-