Wednesday, 24 December 2025

जिल्ह्यातील रुग्णांनी आता घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा जालना, दि.24 (जिमाका) :- ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत आपल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा तज्ज्ञाकडुन आरोग्य सेवाचा लाभ घ्यावा. ही सुविधा आपणास सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 1.45 ते 5 वाजेपर्यंत ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे. जिल्हा रुग्णालय जालना येथे आयुष्यमान आरोग्य मंदीर टेली कन्सल्टेशन हब कार्यरत आहे. येथे 3 विशेषज्ञ व 2 वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहे. यासाठी https://esanjeevani.mohfw.gov.in/#/ किंवा क्यु आर कोड स्कॅन करावा. ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत आपल्या मोबाईलच्या सहाय्याने पुढीलप्रमाणे प्रक्रिया करावी. प्रथमत: आपला मोबाईल नंबर सत्यापित (व्हेरिफाय) करा. नोंदणी झाल्यानंतर टोकन जनरेट करा. नोटीफिकेशन मिळाल्यानंतर लॉग इन करा. तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहावी व त्यानंतर डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. ई-प्रिस्क्रीप्शन डाऊनलोड करा. अशाप्रकारे आपणास घर बसल्या रुग्ण सेवेचा लाभ घेता येईल. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

 

जिल्ह्यातील रुग्णांनी आता घर बसल्या

मोफत बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा

 

जालना, दि.24 (जिमाका) :- ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत आपल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा तज्ज्ञाकडुन आरोग्य सेवाचा लाभ घ्यावा. ही सुविधा आपणास सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 1.45  ते 5 वाजेपर्यंत ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे.  

जिल्हा रुग्णालय जालना येथे आयुष्यमान आरोग्य मंदीर टेली कन्सल्टेशन हब कार्यरत आहे. येथे 3 विशेषज्ञ व 2 वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहे. यासाठी https://esanjeevani.mohfw.gov.in/#/ किंवा क्यु आर कोड स्कॅन करावा. ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत आपल्या मोबाईलच्या सहाय्याने पुढीलप्रमाणे प्रक्रिया करावी. प्रथमत: आपला मोबाईल नंबर सत्यापित (व्हेरिफाय) करा. नोंदणी झाल्यानंतर टोकन जनरेट करा. नोटीफिकेशन मिळाल्यानंतर लॉग इन करा. तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहावी व त्यानंतर डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. ई-प्रिस्क्रीप्शन डाऊनलोड करा. अशाप्रकारे आपणास घर बसल्या रुग्ण सेवेचा लाभ घेता येईल. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

Tuesday, 23 December 2025

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध

 


 

जालना, दि.23 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जालना महानगरपालिका कार्यक्षेत्रातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 1111                                                                   दि. 23 डिसेंबर, 2025

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025

मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध

 

जालना, दि.23 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जालना महानगरपालिका निवडणूक प्रचारफेरी/ मिरवणुकामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरता येतील. त्यापेक्षा जास्त वाहने वापरण्यास महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्‍तल यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 1112                                                                   दि. 23 डिसेंबर, 2025

 

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025

ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध

 

जालना, दि.23 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ मधील प्राप्त अधिकारानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्‍तल यांनी जारी केले आहेत.  

ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6.00 वाजण्यापुर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावा. ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल.सर्व राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. सदरचे आदेश हे जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 -*-*-*-*-

वृत्त क्र. 1113                                                                   दि. 23 डिसेंबर, 2025

 

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025

वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणेवर निर्बंध

 

जालना, दि.23 (जिमाका) :-  राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जालना महानगरपालिका क्षेत्रामध्ये पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्‍तल यांनी जारी केले आहेत.

 प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. सदर वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. सदर वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. असेही आदेशात नमुद केले आहे.

 -*-*-*-*-

वृत्त क्र. 1113                                                                   दि. 23 डिसेंबर, 2025

 

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025

सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर,

रहदारीस अडथळा निर्माण करण्यास निर्बंध

 

जालना, दि.23 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे.  महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जालना महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्‍तल यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 1113                                                                   दि. 23 डिसेंबर, 2025

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025

खाजगी व्यक्तींच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे,

 भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध

 

जालना, दि.23 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. जालना महानगरपालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांचे हितचिंतक यांना निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे आदिसाठी कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाची परवानगीशिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्याची आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्‍तल यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-

 

Monday, 15 December 2025

राष्ट्रीय लोकन्यायालयात तडजोडीने 1 हजार 104 प्रकरणे निकाली

 




           

जालना, दि.15(जिमाका): उच्च न्यायालय,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि न्यायमुर्ती उच्च न्यायालय मुंबई,न्यायमुर्ती उच्च न्यायालय  औरंगाबाद खंडपीठ,येथील न्यायमुर्ती  तथा जालना न्यायीक जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती अरूण आर.पेडणेकर ह्यांनी दुरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित राहून मार्गदर्शन केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम.मोहिते यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक 13 डिसेंबर रोजी पार पडलेल्या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित व दावा दाखलपुर्व अशी सुमारे 39 हजार 823 प्रकरणे ठेवण्यात आली होती.त्यापैकी 1 हजार 104 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहे.जिल्ह्यामधील  न्यायालयात प्रलंबित प्रकरणापैकी एकूण 5 हजार 700 प्रकरणे लोकन्यायालयासाठी ठेवण्यात आली होती.यात दिवाणी,फौजदारी,मोटार अपघात,भूसंपादन आणि 138 एन.आय.ॲक्टच्या प्रकारणांचा समावेश होता.त्यापैकी 542 प्रकरणे निकाली निघाली आहे.तर दाखलपुर्व 34 हजार 123 प्रकरणांपैकी सुमारे 562 प्रकरणे निकाली निघाली आहे. अशी एकुण 1 हजार 104 प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकन्यालयामध्ये 17 कोटी 4 लाख 70 हजार  546 एवढ्या रकमेची प्रकरणे निकाली निघालेली आहे. तसेच कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी 5 परिवारांचा संसार सुखाचा झाला असून पाचही महिला आपल्या पतीच्या घरी नांदण्याकरिता गेल्या आहेत.

यावेळी जिल्हा न्यायाधीश एन.एस.शेख,जिल्हा न्यायाधीश आर.बी.पारवेकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश जी.आर.ढेपे, सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जालना नितेश एम.बंडगर आणि जालना मुख्यालयातील सर्व न्यायीक अधिकारी, जालना जिल्हा वकील संघ अध्यक्ष अनिरूध्द बी.घुले पाटील,जिल्हा वकील संघाचे सर्व पदाधीकारी,सर्व विधिज्ञ,जिल्हा सरकारी वकील,जिल्हा सरकारी अभियोक्ता यांची उपस्थिती होती.असे प्रभारी सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना,यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

Thursday, 11 December 2025

ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण करावे-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 






       

जालना, दि.11(जिमाका): सशस्त्र सेना ध्वज दिन भारतीय सशस्त्र दलातील शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या योगदानाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी तसेच विशेषतः आपले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांकरीता विविध कल्याणाकारी योजना राबविण्यासाठी आणि मदत करण्यासाठी साजारा केला जातो समर्पित. जिह्याला ध्वज दिन निधी संकलनाचे 2025 साठी 46 लाख 50 हजार रूपयांचे उद्दीष्ट असून, सर्व विभागांनी आपले उद्दीष्ट पूर्ण करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी  केले.

येथील जिल्हा सैनिक कार्यालयात आज सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभाच्या कार्यक्रमात श्रीमती मित्तल बोलत होत्या. यावेळी पोलीस उपनिरिक्षक आर. डी. निकाळजे, उपशिक्षणाधिकारी (मा.) अनिल पवार, शिक्षणाधिकारी (प्रा.) संजय कायंदे, जॉन नवगिरे आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर डॉ. रुपाली मानमोडे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यावेळी म्हणाल्या की, सशस्त्र सैना दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करत असतात. त्यामुळेचे आपण येथे सुरक्षित व शांतते जीवन जगतो. सशस्त्र सैना दलाचे जवान व अधिकारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटूंबीयांची पर्वा न करता देश आणि आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सीमेवर सदैव तैनात असतात. देशाच्या रक्षणाची भूमिका बजावत असताना आपले जवान सैनिक सण, समारंभ, कार्यक्रम यांचा विचारही न करता ते सतत देशसेवा करत असतात. अशा लष्करी अधिकारी व जवानांची आणि त्यांच्या कुटूंबियाची काळजी घेणे ही आपणां सर्वांची नैतीक जबाबदारी आहे. या जबाबदारीच्या भावनेतून सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन करण्याच्या सत्कार्याला मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे ही श्रीमती मित्तल यांनी यावेळी यावेळी सांगितलते.

मान्यवरांच्या हस्ते यावेळी वीर माता-पिता, वीर पत्नी, गुणवंत विद्यार्थी तसेच ध्वज दिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या विभाग प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रारंभी सशस्त्र सेनेचे प्रतिक असलेले छोटे ध्वज वितरित करुन निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर डॉ. रुपाली मानमोडे म्हणाल्या की, सन 2024 करीता 99 लाख 25 हजार रुपये निधी संकलन झाला असून, 299 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर सन 2025 करीता 46 लाख 50 हजाराचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात शहिद जवानांना श्रध्दांजली वाहुन करण्यात आली तर कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.

                                   -*-*-*-*-*-*-

Tuesday, 9 December 2025

प्रत्येक कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपवर नोंदवून जनगणना केली जाईल -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

 

जालना दि. 9 (जिमाका) :-  जनगणना-2027 हा खुप महत्वाचा विषय आहे. भारताच्या इतिहासातील प्रचंड मोठा बदल आहे. जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. जनगणना ही एकाच टप्प्यात पार पडणार आहे. कोणतेही घर अथवा कुटुंब या जनगणनेतून सुटता कामा नये,  जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेसह पालिकेतील अधिकाऱ्यांना मास्टर ट्रेनर्स म्हणून तयार करण्यात येणार आहे. 5 जानेवारीपर्यंत हाऊस लिस्टींग ब्लॉक तयार करावयाचा आहे. तसेच स्वत:च्या मोबाईलद्वारे प्रगणकाला प्रत्येक कुटुंबाची अचुक माहिती ही ॲपवर नोंदवून जनगणना केली जाईल,  अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

भारताची जनगणना- 2027 साठी प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार अनिल नव्हाते यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी प्रत्यक्ष तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी हे दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्ह्यातील जनगणना ही पुढील वर्षात केली जाणार आहे. यामध्ये 5 जानेवारी 2026 पर्यंत हाऊस लिस्टींग ब्लॉक तयार करणे. दि.20 जानेवारीपर्यंत प्रगणकाची यादी तयार करण्यात येईल.  10 जानेवारीपर्यंत मास्टर ट्रेनर्सची निश्चिती होईल. आणि दि.31 जानेवारीपर्यंत फिल्ड ट्रेनर्स निश्चित केले जातील. अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिली.

प्रत्येक टप्प्यावर तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी पडताळणी करुन खात्री झाल्यानंतरच आपली स्वाक्षरी प्रपत्रावर करावी. जिल्हास्तरावरही मास्टर्स ट्रेनर्स निवडून यामध्ये ट्रेनिंग मुद्देसुद्द दिली जाणार आहे. डिजीटल जनगणना केली जाणार असून मे आणि जुनमध्ये हाऊस आयडेंटीफाय करुन त्यांना क्रमांक दिला जाणार आहे. जनगणनेसाठी तालुकास्तरावर कार्यक्षम व तंत्रस्नेही 10 अधिकारी-कर्मचारी घेवून जनगणना 2027 कक्ष स्थापन करावा जेणेकरुन भविष्यात समन्वय साधण्यास अडचण निर्माण होणार नाही. सहा प्रगणकामागे एक पर्यवेक्षकाची नेमणूक करावी लागणार आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

-*-*-*-*-

पारसी टेकडी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल केशवसृष्टी इरकॉन घनवनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

 



 

जालना दि. 9 (जिमाका) :-  पारसी टेकडीला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, या भागाचे सुशोभीकरण करून ते पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

इरकॉन भोज कंपनीच्यावतीने पारसी टेकडी येथील घनवनात 1000 वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्याचे लोकार्पण मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी व त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, केशव सृष्टी मुंबई संस्थेचे विश्वस्त निलकंठण अय्यर, उद्योजक रमेशभाई पटेल, सुनिल रायठठ्ठा, शिवरतन मुंदडा, नितीन काबरा, गोविंद गोयल, राहूल अग्रवाल, डॉ. विठ्ठल पवार, डॉ. प्रकाश सिगेदार, सुरेश कुलकर्णी, हेमंत ठक्कर, यश पूरी, डॉ. आशुतोष सोनी, सचिन लोहीया, डॉ. रितेश अग्रवाल, चिराग तलरेजा, विष्णू पाटेकर यांच्यासह विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, पारसी टेकडी परिसरात नैसर्गिक सौंदर्य ऐतिहासिक महत्त्व असलेली ठिकाणे असल्याने येथे पर्यटनाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या ठिकाणाचा विकास झाल्यास रोजगार निर्मितीबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना, बसण्याची व्यवस्था, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा तसेच माहिती फलकांची उभारणी यांसारख्या मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. इरकॉन भोज कंपनीच्या वतीने पारसी टेकडी येथील घनवनात 1000 वृक्षांचे संगोपन करण्याचे काम समस्त महाजन, कुंडलिका व सिना फाउंडेशन करणार आहे. केशवसृष्टी संस्थेने आतापर्यंत 65 हजार वृक्ष पारसी टेकडीवर लावलेले असून 3.5 लाख वृक्ष संवर्धित होत आहेत. लोकसहभागातून पारसी टेकडीवर वृक्षारोपण वृक्षसंवर्धन कार्य सुरू असून विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह सक्रियपणे येथे योगदान देत आहेत. केशवसृष्टी संस्थेचे निलकंठण अय्यर यांचे जालना शहरवासियांच्यावतीने आभार व्यक्त करत विशेष सत्कार करण्यात आला.

-*-*-*-*-

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

 

 

जालना दि. 9 (जिमाका) :-  जालना जिल्ह्यात विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ अंतर्गत पशुपालकांसाठी विविध योजना महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीमध्ये दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.  ५० टक्के अनुदानावर उच्च दुधउत्पादन क्षमता असलेल्या १ दुधाळ गाय/म्हशीचे वाटप.  ७५ टक्के अनुदानावर उच्च दुधउत्पादन क्षमता असलेल्या १ भृनाचे प्रत्यारोपण केलेली सात महिन्याची गाभण कालवड वाटप.  २५ टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य पुरवठा.  २५ टक्के अनुदानावर फट व एसएनएफ वर्धक खाद्य पुरवठा.  ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप.  २५ टक्के अनुदानावर मुरघास पुरवठा.  १०० टक्के अनुदानावर सावर बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी बियाणे/ठोंबे वाटप. तरी या योजनांचा लाभ घेण्याकरीता जास्तीत जास्त पशुपालकांनी www.vmddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जालना यांनी केले आहे. तसेच योजनांसंबंधी अधिक माहितीकरीता विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ चे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल जाधव जालना यांना ८६०५४५१८५० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

'अमृत' संस्था देतेय प्रशिक्षण; व्याज परतावा योजनेचाही लाभ

 

 

 

 जालना दि. 9 (जिमाका) :-  जागतिक बाजारपेठेत व्यवसाय संधी वाढत आहेत. तरुण उ‌द्योजकांना आयात-निर्यात व्यवसायाकडे वळवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेकडून 'अमृत'च्या लक्ष्यित गटासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या, तसेच विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या उ‌द्योजकांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. आयात-निर्यात क्षेत्रामध्ये रोजगार व उद्यमशीलतेच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे इच्छुक युवक-युवती, व्यापारी आणि उ‌द्योजकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

या प्रशिक्षणामध्ये परदेशी व्यापार धोरणे, निर्यात कागदपत्रे, सीमाशुल्क प्रक्रिया, परदेशी बाजारपेठेची निवड, लॉजिस्टिक्स व्यवस्थापन, ऑनलाइन व्यापार तंत्रज्ञान तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ अशा महत्त्वपूर्ण विषयांवर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थीना तज्ज्ञ मार्गदर्शन, उद्‌द्योग क्षेत्राशी नेटवर्किंग, व्यवसाय स्थापनेसाठी तांत्रिक साह्य अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Monday, 8 December 2025

संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन जालना, दि.8 (जिमाका) : संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्र.अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार सतिश तायडे, दिपाली वानखेडे, रविंद्र हेलगट, संपदा कुलकर्णी, मिनाक्षी देवशी, मिना नगरकर, सविता भोकरे, सुनिल काळुंके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. -*-*-*-*-

संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन जालना, दि.8 (जिमाका) : संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्र.अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार सतिश तायडे, दिपाली वानखेडे, रविंद्र हेलगट, संपदा कुलकर्णी, मिनाक्षी देवशी, मिना नगरकर, सविता भोकरे, सुनिल काळुंके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. -*-*-*-*-

ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध - प्र. अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे जालना दि. 8 (जिमाका) :- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे असे आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारींची त्वरित सोडवणूक करणे हे देखील परिषदेचे कार्य आहे. या उद्देशांसाठी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्रामीण भागात विविध माध्यमांद्वारे ग्राहक जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच जालना जिल्ह्यातील ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केले आहे. जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक प्रभारी अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव सविता चौधर यांच्यासह ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. सध्या अनेक विभागांनी तक्रारी नोंदवण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांनी या सुविधेचा वापर करून आपल्या तक्रारी ऑनलाइन नोंदवाव्यात. तसेच, nic.jalna या संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर कराव्यात, जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर केले जाईल. जिल्ह्यात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन दि.24 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार असून सर्व सदस्यांनी ग्राहक दिन साजरा करण्याबाबत आपल्या संकल्पना सांगाव्यात. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अशासकीय सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारींचे समाधान करुन निराकरणही करण्यात आले. -*-*-*-*-

ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध - प्र. अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे जालना दि. 8 (जिमाका) :- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे असे आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारींची त्वरित सोडवणूक करणे हे देखील परिषदेचे कार्य आहे. या उद्देशांसाठी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्रामीण भागात विविध माध्यमांद्वारे ग्राहक जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच जालना जिल्ह्यातील ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केले आहे. जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक प्रभारी अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव सविता चौधर यांच्यासह ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. सध्या अनेक विभागांनी तक्रारी नोंदवण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांनी या सुविधेचा वापर करून आपल्या तक्रारी ऑनलाइन नोंदवाव्यात. तसेच, nic.jalna या संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर कराव्यात, जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर केले जाईल. जिल्ह्यात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन दि.24 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार असून सर्व सदस्यांनी ग्राहक दिन साजरा करण्याबाबत आपल्या संकल्पना सांगाव्यात. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अशासकीय सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारींचे समाधान करुन निराकरणही करण्यात आले. -*-*-*-*-

जनजागृती, समन्वय आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर काम केल्यास अपघातांना आळा बसेल जालना दि. 8 (जिमाका) :- जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृती मोहिम राबाविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय ठेवून काम करावेत. जनजागृती, समन्वय आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर काम केल्यास जिल्ह्यातील अपघातांना निश्चितच आळा बसेल, असे प्रतिपादन अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केले. जिल्ह्यात अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नुकतीच एक महत्त्वाची रस्ता सुरक्षा विषयक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्र.अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. अपघात कमी करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरुणांमध्ये सुरक्षित वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरेल. केवळ नियम बनवून चालणार नाही, तर त्यांची कठोर अंमलबजावणी आणि अपघात प्रवण ठिकाणे सुधारण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यात घडलेल्या मोटार वाहन अपघाताच्या प्रकरणाचा मागील तीन वर्षातील संख्येचा आढावा घेण्यात आला. -*-*-*-*-

जनजागृती, समन्वय आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर काम केल्यास अपघातांना आळा बसेल जालना दि. 8 (जिमाका) :- जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृती मोहिम राबाविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय ठेवून काम करावेत. जनजागृती, समन्वय आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर काम केल्यास जिल्ह्यातील अपघातांना निश्चितच आळा बसेल, असे प्रतिपादन अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केले. जिल्ह्यात अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नुकतीच एक महत्त्वाची रस्ता सुरक्षा विषयक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्र.अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. अपघात कमी करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरुणांमध्ये सुरक्षित वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरेल. केवळ नियम बनवून चालणार नाही, तर त्यांची कठोर अंमलबजावणी आणि अपघात प्रवण ठिकाणे सुधारण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यात घडलेल्या मोटार वाहन अपघाताच्या प्रकरणाचा मागील तीन वर्षातील संख्येचा आढावा घेण्यात आला. -*-*-*-*-

ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध - प्र. अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे जालना दि. 8 (जिमाका) :- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे असे आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारींची त्वरित सोडवणूक करणे हे देखील परिषदेचे कार्य आहे. या उद्देशांसाठी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्रामीण भागात विविध माध्यमांद्वारे ग्राहक जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच जालना जिल्ह्यातील ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केले आहे. जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक प्रभारी अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव सविता चौधर यांच्यासह ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. सध्या अनेक विभागांनी तक्रारी नोंदवण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांनी या सुविधेचा वापर करून आपल्या तक्रारी ऑनलाइन नोंदवाव्यात. तसेच, nic.jalna या संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर कराव्यात, जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर केले जाईल. जिल्ह्यात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन दि.24 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार असून सर्व सदस्यांनी ग्राहक दिन साजरा करण्याबाबत आपल्या संकल्पना सांगाव्यात. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अशासकीय सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारींचे समाधान करुन निराकरणही करण्यात आले. -*-*-*-*-

ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध - प्र. अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे जालना दि. 8 (जिमाका) :- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे असे आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारींची त्वरित सोडवणूक करणे हे देखील परिषदेचे कार्य आहे. या उद्देशांसाठी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्रामीण भागात विविध माध्यमांद्वारे ग्राहक जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच जालना जिल्ह्यातील ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केले आहे. जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक प्रभारी अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव सविता चौधर यांच्यासह ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. सध्या अनेक विभागांनी तक्रारी नोंदवण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांनी या सुविधेचा वापर करून आपल्या तक्रारी ऑनलाइन नोंदवाव्यात. तसेच, nic.jalna या संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर कराव्यात, जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर केले जाईल. जिल्ह्यात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन दि.24 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार असून सर्व सदस्यांनी ग्राहक दिन साजरा करण्याबाबत आपल्या संकल्पना सांगाव्यात. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अशासकीय सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारींचे समाधान करुन निराकरणही करण्यात आले. -*-*-*-*-

Thursday, 4 December 2025

11 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जालना दि. 4 (जिमाका) :- भारतमातेच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जिवनातील अडी-अडचणी दुर करुन त्यांचे दैनंदिन जिवन सुसह्य व्हावे यासाठी व त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातुन सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी संपुर्ण भारतात 7 डिसेंबर हा दिवस "ध्वजदिन " म्हणुन साजरा करण्यात येतो. व त्या निमित्ताने 07 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेर पर्यंत ध्वजदिन निधी संकलन केले जाते. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना यांचे वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ गुरुवार दि. 11 डिसेंबर 2025 रोजी दूपारी 3 वाजता महासैनिक लॉन, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, क्रीडा संकूलासमोर, जालना येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा ध्वजदिन निधी संकलन समिती अध्यक्ष आशिमा मित्तल यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाच्यानिमित्त शहीद जवानांना श्रध्दांजली, देशाच्या सिमांचे रक्षण करतांना प्राणाचे बलिदान देवून शहिद झालेल्या सैनिकांच्या विरपत्नी, विरमाता व विरपिता यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांमध्ये सैनिकांविषयी जनजागृती व आपुलकी निर्माण करुन उत्कृष्ट कामगिरी करुन ध्वजदिन-2024 निधी संकलन केलेल्या कार्यालयांना पारितोषिक कार्यालय प्रमुख व संबंधीत कर्मचाऱ्यांस प्रशस्तीपत्र वाटप तसेच माजी सैनिक, विधवा पत्नी यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, आर्थिक मदतीचे धनादेश, गौरव पुरस्कार व प्रशस्तीपत्र वाटप करण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व वीर पत्नी, वीर पिता, वीर माता, माजी सैनिक विधवा पत्नी, माजी सैनिक व त्यांचे अवलंबित, पत्रकार बांधव, उत्कृष्ट संकलन केलेल्या कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व सामान्य नागरिकांनी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

 

11 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

 

         जालना दि. 4 (जिमाका) :-  भारतमातेच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जिवनातील अडी-अडचणी दुर करुन त्यांचे दैनंदिन जिवन सुसह्य व्हावे यासाठी व त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातुन सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी संपुर्ण भारतात 7 डिसेंबर हा दिवस  "ध्वजदिन " म्हणुन साजरा करण्यात येतो. व त्या निमित्ताने  07 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेर पर्यंत ध्वजदिन निधी संकलन केले जाते.   दरवर्षी प्रमाणे या वर्षीही  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना यांचे वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ गुरुवार दि. 11 डिसेंबर 2025 रोजी दूपारी 3  वाजता महासैनिक लॉन, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, क्रीडा संकूलासमोर, जालना येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा ध्वजदिन निधी संकलन समिती अध्यक्ष आशिमा मित्तल यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम.,  पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

            सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाच्यानिमित्त शहीद जवानांना श्रध्दांजली,   देशाच्या सिमांचे रक्षण करतांना प्राणाचे बलिदान देवून शहिद झालेल्या सैनिकांच्या विरपत्नी, विरमाता व विरपिता यांचा गौरव करण्यात येणार आहे.  तसेच नागरिकांमध्ये सैनिकांविषयी जनजागृती व आपुलकी निर्माण करुन उत्कृष्ट कामगिरी करुन ध्वजदिन-2024 निधी संकलन केलेल्या कार्यालयांना पारितोषिक कार्यालय प्रमुख व संबंधीत कर्मचाऱ्यांस प्रशस्तीपत्र वाटप तसेच माजी सैनिक, विधवा पत्नी यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, आर्थिक मदतीचे धनादेश, गौरव पुरस्कार व प्रशस्तीपत्र वाटप करण्यात येणार आहेत.  तरी जिल्ह्यातील सर्व वीर पत्नी, वीर पिता, वीर माता, माजी सैनिक विधवा पत्नी, माजी सैनिक व त्यांचे अवलंबित, पत्रकार बांधव, उत्कृष्ट संकलन केलेल्या कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व सामान्य नागरिकांनी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

शिकाऊ उमेदवारीसाठी भरती मेळावा जालना, दि.4 (जिमाका) :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राकडून जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन दि.8 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आला आहे. भरती मेळाव्यात जालना, छत्रपती संभाजीनगर व जालना येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. अंतिम वर्षात शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहप्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. -*-*-*-*-

 

शिकाऊ उमेदवारीसाठी भरती मेळावा  

जालना, दि.4 (जिमाका) :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राकडून जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन दि.8 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आला आहे. भरती मेळाव्यात जालना, छत्रपती संभाजीनगर  व जालना येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. अंतिम वर्षात शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहप्रशिक्षणार्थी सल्लागार,  मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन जालना दि. 4 (जिमाका) :- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.8 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला समितीवर नियुक्त शासकीय सदस्य, अशासकीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे ग्राहक हितासंबंधीत तक्रार असल्यास सदर बैठकीच्या दिवशी उपस्थित राहून आपला लेखी स्वरुपाचा अर्ज सादर करावा. तसेच नागरिकांना ग्राहक या संबंधाने काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जालना संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. -*-*-*-*-

 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन

 

जालना दि. 4 (जिमाका) :- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.8 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला समितीवर नियुक्त शासकीय सदस्य, अशासकीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे ग्राहक हितासंबंधीत तक्रार असल्यास सदर बैठकीच्या दिवशी उपस्थित राहून आपला लेखी स्वरुपाचा अर्ज सादर करावा. तसेच नागरिकांना  ग्राहक या संबंधाने काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जालना संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आगामी परीक्षांचे वेळापत्रक प्रसिध्द जालना दि. 4 (जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासनाच्या मागणीनूसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानूसार वर्ष-2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. तरी संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था आदिकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2026 मध्ये आयोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या स्पर्धा परीक्षा बाबतच्या अधिक माहितीसाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. सविस्तर वेळापत्रक- https://mahasamvad.in/185086/ या लिंकवर उपलब्ध आहे. अशी माहिती अवर सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. -*-*-*-*-

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून

आगामी परीक्षांचे वेळापत्रक प्रसिध्द

 

जालना दि. 4 (जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासनाच्या मागणीनूसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानूसार वर्ष-2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. तरी संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था आदिकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2026 मध्ये आयोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या स्पर्धा परीक्षा बाबतच्या अधिक माहितीसाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. सविस्तर वेळापत्रक- https://mahasamvad.in/185086/ या लिंकवर उपलब्ध आहे.  अशी माहिती अवर सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-

Wednesday, 3 December 2025

गोसेवा आयोग पुरस्कारासाठी आवाहन जालना दि. 3 (जिमाका) :- महाराष्ट्र गोसेवा आयोगाने राज्यातील देशी गोवंशाचे संरक्षण, संवर्धन आणि कल्याण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नोंदणीकृत गोशाळा आणि शुद्ध गोवंश प्रक्षेत्रांना 'श्रेष्ठ राजदूत' (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून सन्मानित करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एकूण दोन संस्थेची या सन्मानासाठी निवड केली जाणार असून, त्यांना 'गोसेवा आयोग पुरस्कार' प्रदान केला जाणार आहे. तरी पात्र नोंदणीकृत गोशाळा, गोसदन आणि पांजरपोळ संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र गोसेवा आयोगाने केले आहे. निवडीसाठी संस्थांनी गोवंश संवर्धन, गोमय (गोबर) आणि गोमूत्र आधारित उत्पादनांचे मूल्यवर्धन, गो-आधारित प्राकृतिक (सेंद्रिय) शेती, गोशाळा व्यवस्थापन, गो पर्यटन, गोसंवर्धन केंद्राचे व्यवस्थापन आणि सामाजिक सहभाग अशा दहा 'गो-धोरणांवर' प्रभावीपणे काम केलेले असणे आदि निकष लावण्यात आले आहेत. आयोगाच्या नियमावलीनुसार, केवळ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांनाच सन्मानित करून त्यांना 'आत्मनिर्भर गोशाळा' बनविण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय पडताळणी समिती अहवाल सादर करेल. सर्व पात्र नोंदणीकृत गोशाळा, गोसदन आणि पांजरपोळ संस्थांनी या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या संबंधित जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. असे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

 

गोसेवा आयोग पुरस्कारासाठी आवाहन

 

    जालना दि. 3 (जिमाका) :-  महाराष्ट्र गोसेवा आयोगाने राज्यातील देशी गोवंशाचे संरक्षण, संवर्धन आणि कल्याण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नोंदणीकृत गोशाळा आणि शुद्ध गोवंश प्रक्षेत्रांना 'श्रेष्ठ राजदूत' (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून सन्मानित करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एकूण दोन संस्थेची या सन्मानासाठी निवड केली जाणार असून, त्यांना 'गोसेवा आयोग पुरस्कार' प्रदान केला जाणार आहे. तरी पात्र नोंदणीकृत गोशाळा, गोसदन आणि पांजरपोळ संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र गोसेवा आयोगाने केले आहे.

निवडीसाठी संस्थांनी गोवंश संवर्धन, गोमय (गोबर) आणि गोमूत्र आधारित उत्पादनांचे मूल्यवर्धन, गो-आधारित प्राकृतिक (सेंद्रिय) शेती, गोशाळा व्यवस्थापन, गो पर्यटन, गोसंवर्धन केंद्राचे व्यवस्थापन आणि सामाजिक सहभाग अशा दहा 'गो-धोरणांवर' प्रभावीपणे काम केलेले असणे आदि निकष लावण्यात आले आहेत. आयोगाच्या नियमावलीनुसार, केवळ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांनाच सन्मानित करून त्यांना 'आत्मनिर्भर गोशाळा' बनविण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय पडताळणी समिती अहवाल सादर करेल. सर्व पात्र नोंदणीकृत गोशाळा, गोसदन आणि पांजरपोळ संस्थांनी या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या संबंधित जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. असे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर जालना दि. 3 (जिमाका) :- जिल्ह्यातील भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी सुधारित निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. कार्यक्रमानूसार प्रभाग क्र.1 अ व 9 ब साठी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दि.10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. दि.11 डिसेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. मतदान दि.20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 यावेळेत घेण्यात येईल. नगर परिषद मंगल कार्यालयात मतमोजणीसह निकाल दि.21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. आणि दि.23 डिसेंबर 2025 पुर्वी कलम 21 मधील तरतूदीनुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. -*-*-*-*-

 

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर 

 

    जालना दि. 3 (जिमाका) :-  जिल्ह्यातील भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी सुधारित निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. कार्यक्रमानूसार प्रभाग क्र.1 अ व 9 ब साठी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दि.10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. दि.11 डिसेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.  मतदान दि.20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 यावेळेत घेण्यात येईल. नगर परिषद मंगल कार्यालयात मतमोजणीसह निकाल दि.21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. आणि दि.23 डिसेंबर 2025 पुर्वी कलम 21 मधील तरतूदीनुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.

-*-*-*-*-

 

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी जालना, दि. 3 (जिमाका) :- जिल्ह्यात 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती, दि.6 डिसेंबर रोजी दरवर्षी मुस्लीम धर्मीय काळा दिवस पाळतात तर हिंदु संघटना विजयी दिवस साजरा करतात. तसेच या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.16 डिसेंबर 2025 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत. संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 16 डिसेंबर 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. -*-*-*-*-

 

जिल्ह्यात शस्त्रबंदी  जमावबंदी आदेश जारी

           जालना, दि. 3 (जिमाका) :- जिल्ह्यात 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती, दि.6 डिसेंबर रोजी दरवर्षी मुस्लीम धर्मीय काळा दिवस पाळतात तर हिंदु संघटना विजयी दिवस साजरा करतात. तसेच या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण  दिन आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.16 डिसेंबर 2025 पर्यंत  शस्त्रबंदी    जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी  शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.   

           संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी  जमावबंदी आदेश दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 16 डिसेंबर 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-