जालना, दि.6 (जिमाका) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व युवा कार्यक्रम मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2024-25 उत्सवात संपन्न झाला.
येथील शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्घाटन
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पोलीस अधीक्षक
अजयकुमार बन्सल जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल
सूर्यवंशी, शाहीर रामानंद उगले , जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे, जिल्हा युवा अधिकारी
प्रणित सांगवीकर प्राचार्य आयटीआय कॉलेज प्राध्यापक डॉ. प्रवीण उखळीकर जिल्हा समन्वयक
राष्ट्रीय सेवा योजना प्राध्यापक डॉ. सोमीनाथ खाडे क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी
,श्रीमती आरती चिल्लारे, क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम, राहुल गायके आदी उपस्थित
होते.
या जिल्हास्तरीय महोत्सवांमध्ये समूह लोकनृत्य ,समूह लोकगीत, कविता
लेखन, कथालेखन ,वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नव संकल्पना व युथ आयकॉन
इत्यादी बाब असून विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक प्रमाणपत्र व ट्रॉफी असून यामध्ये
प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गायके
, किशोर नावकर, अमर लोंढे , प्रा. शाम चव्हाण ,श्री प्रा. सतीश मगरे आदी यांनी कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे
प्रमुख उद्घाटक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व स्पर्धकांनी कलाक्षेत्रात
आपले नाव उज्वल करावे अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा
क्रीडा अधिकारी संजय गाढवे व जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या
सूत्रसंचालन मिलन सावंत यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर रेखा परदेशी
यांनी केले.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विजयी झालेल्या कलाकारांना
प्रमाणपत्र व पारितोषिक व रोख रक्कम देण्यात
आले. बक्षिस वितरणसाठी प्रा. बसवराज कोरे व शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल धुपे , संजय
गाढवे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे.
1.कला प्रकार
-:-समुह लोकगीत –प्रथम- मत्स्योदरी महाविद्यालय,
अंबड, ता. अंबड, जि.जालना
द्वितीय- जे.ई.एस.महाविद्यालय,जालना
तृतीय- मॉडर्न कॉलेज ,घनसावंगी
2.कला प्रकार
-:-समुह लोकनृत्य़- प्रथम- उत्कर्ष थेटर्स
डान्स़ ग्रुप,जालना
द्वितीय-
मत्स्योदरी महा.अंबड
तृतीय- मॉडर्न कॉलेज ,घनसावंगी
3.कला प्रकार:-
वक्तृत्व स्पर्धा –प्रथम- आदिती अरविंद सुरंगळीकर
द्वितीय- धनश्री संजय टेकाळे
तृतीय-सुचित संतोष शिंदे
4.कला प्रकार:-
वक्तृत्व स्पर्धा –प्रथम- आदिती अरविंद सुरंगळीकर
द्वितीय- धनश्री संजय टेकाळे
तृतीय-सुचित संतोष शिंदे
5.कला प्रकार-चित्रकला-
प्रथम- प्रिया तातेराव दुर्गुळे
द्वितीय- करण मनोहर जगताप
तृतीय-हर्षा युवराज चव्हाण
6.कला प्रकार -कथालेखन
- प्रथम- शिवप्रसाद अनिल नागवे
द्वितीय- हर्षल प्रविणकुमार उखळीकर
तृतीय-गोपाल उत्त़मराव तौर
7.कला प्रकार-कवितालेखन-
प्रथम- स्वप्नील सोपान खरात
द्वितीय- राहूल महादेव कासोदे
तृतीय-योगेश बाबासाहेब खोसे
8.कला प्रकार-सायन्स़
मेला-प्रथम- पार्थ उध्दव घुमरे
द्वितीय-
कार्तिक ऋषिधर शिंदे
तृतीय-महिमा नितीन भुरेवाल
9.कला प्रकार-सायन्स़
मेला-प्रथम- आय टी आय कॉलेज ,जालना
सामुहीक द्वितीय- एम एस एस कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ,जालना
तृतीय-एम
एस एस कॉलेज ऑफ अंबड.
-*-*-*-*-*-*-






No comments:
Post a Comment