Monday, 25 November 2024

भारतीय संविधान दिनानिमित्त समाज कल्याण कार्यालयामध्ये व्याख्यानाचे आयोजन

 


 

        जालना,दि.25 (जिमाका):  भारतीय संविधान दिनानिमित्त  दि. 26 नोव्हेंबर, 2024 रोजी सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालय यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहामध्ये सकाळी 11.00 वाजता ‘भारताचे संविधान’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणुन प्रा. डॉ. विजयकुमार कुमठेकर, मत्स्योदरी महाविद्यालय, जालना तसेच इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना अनंत कदम  यांनी केले आहे. 

26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत करुन, 26 जानेवारी, 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जीवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.

             भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 या अमृतमहोत्सवी वर्षात "घर घर संविधान " हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे.

 

****

21 व्या पशु गणनेची 25 नोव्हेंबरपासून सुरुवात

 


        जालना,दि.25 (जिमाका):  केंद्र पुरस्कृत 21 वी पशु गणना दि. 25 नोव्हेंबर, 2024 पासून सुरू होत आहे. पशुसंवर्धन विभागाकरिता अत्यंत महत्त्वाची गणना असून, या गणनेमधून प्राप्त होणारी माहिती पुढील पाच वर्ष नियोजन, धोरणात्मक निर्णय व विविध योजनांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने पशुगणना अतिशय महत्त्वाची आहे.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत दर 5 वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. सदर पशुगणनेमध्ये 16 प्रजातीच्या पशुधन व कुकुटादी पक्षी जात, लिंग व वय निहाय गणना करण्यात येणार आहे. पशुगणना दि. 25 नोव्हेंबर, 2024 ते 28 फेब्रुवारी, 2025 पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. आपल्या जिल्ह्यातील 163 प्रगणक व 37 पर्यवेक्षक यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पशुगणनेसाठी नागरी भागाकरिता प्रती 4,000 कुटूंबामध्ये एक प्रगणक व 10 प्रगणकामागे 1 पर्यवेक्षक तर ग्रामीण भागाकरिता प्रती 3,000 कुटूंबामागे एक प्रगणक व प्रती 5 प्रगणकामागे 5 पर्यवेक्षक याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 25 नोव्हेंबर, 2024 पासून पशुगणना सुरू करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. पशुगणना अचूक व विहित कालावधीत होण्याकरिता वेळोवेळी संबंधितांना मार्गदर्शन करुन आढावा घेण्यात येणार आहे. तसेच घरोघरी जाऊन पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. डी.एम. गोल्हेर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जालना यांनी केले आहे.

****

लोकशाही दिनाचे 2 डिसेंबर रोजी आयोजन

 


जालना, दि. 26 (जिमाका): जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याचे पहिल्या सोमवारी करण्याबाबत निर्देश आहेत. जिल्ह्यात दि. 2 डिसेंबर, 2024 सोमवार रोजी सकाळी ठिक 10.00 ते 12.00 वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे. या लोकशाही दिनामध्ये अर्ज देतांना त्यांनी संबंधित तालूक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यात दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा. तसेच ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही, अशा अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी कळविले आहे. कोणत्याही स्तरावर लोकशाही दिनात खालील बाबींशी संबंधित अर्ज स्वीकारले जाणर नाहीत. न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील, सेवाविषयक आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाशी तसलीदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदती व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये. तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्याचा अर्ज  http:jalna.mic.in  या संकेस्थळावर उपलब्ध असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य) नम्रता चाटे यांनी कळविले आहे.

 

****

 

3571

 

 

 

 

 

Saturday, 23 November 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 103-भोकरदन विधानसभा मतदार संघातून दानवे संतोष रावसाहेब विजयी

 



जालना, (जिमाका)दि.23: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 103-भोकरदन मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज येथील नगर परिषद मंगल कार्यालय, भोकरदन येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला. 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार दानवे संतोष रावसाहेब यांना 1,28,480 मते मिळाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पुंडलीकराव दानवे यांना 1,05,301 इतकी मते मिळाली. यात भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार दानवे संतोष रावसाहेब हे 23,179 मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करुन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांनी दानवे संतोष रावसाहेब यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दयानंद जगताप, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बनकर,  यांची उपस्थिती  होती.

103-भोकरदन विधानसभा मतदारसंघातून एकुण 32 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते  प्राप्त झाली आहेत.

 

.क्र.

उमेदवारांचे नांव

पक्ष

मिळालेली मते

1

चंद्रकांत पुंडलीकराव दानवे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

1,05,301

2

दानवे संतोष रावसाहेब

भारतीय जनता पार्टी

1,28,480

3

राहुल जांलिदर छडीदार

बहुजन समाज पार्टी

870

4

ॲड. साहेबराव माधवराव पंडीत

हिंदुस्तान जनता पार्टी

357

5

मयुर  रमेशराव बोर्डे

स्वाभीमानी पक्ष

493

6

दिपक भिमराव बो-हाडे

वंचित बहूजन आघाडी

2,031

7

दिगंबर बापुराव क-हाळे

भारतीय वीर किसान पार्टी

167

8

विकास विजय जाधव

महाराष्ट्र स्वराज्य पार्टी

528

9

ॲड. शिरसाठ फकीरा हरी

पिपल्स पार्टी ऑफ इंडीया (डे.)

98

10

गजानन सिताराम बर्डे

भारतिय आदिवासी पार्टी

351

11

अंजली संधु भुमे

ऑल इंडीया फॉरवर्ड ब्लॉक

120

12

सुनिल लक्ष्मणराव वाकेकर

विदूथलाई ‍विरुथलाईगल काटची

105

13

सुनिल गिनाजी इंगळे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डे)

108

14

रवी ‍विजयकुमार हिवाळे

अपक्ष

189

15

कडूबा म्हातारबा इंगळे

अपक्ष

588

16

यासीन सलिम मदार

अपक्ष

71

17

केशव रामकिशन देठे

अपक्ष

1,544

18

केशव आनंदराव जंजाळ

अपक्ष

3,699

19

योगेश पाटील शिंदे

अपक्ष

69

20

वैशाली सुरेश दाभाडे

अपक्ष

2,370

21

महादू लक्ष्मण सुरडकर

अपक्ष

152

22

कैलास रामदास पाचगे

अपक्ष

1,115

23

गणेश रतन साबळे

अपक्ष

189

24

नासेर दाऊद शेख

अपक्ष

127

25

रफीक अब्बास  शेख

अपक्ष

90

26

चंद्रशेखर उत्तमराव दानवे

अपक्ष

103

27

अकबर अली अकरम अली खान

अपक्ष

133

28

जगन तुकाराम लोखंडे

अपक्ष

39

29

शिवाजी आत्माराम भिसे

अपक्ष

519

30

निलेश बलीराम लाथे

अपक्ष

161

31

जगदीश दिलीप राऊत

अपक्ष

73

32

दिवाकर कुंडलिक गायकवाड

अपक्ष

68

33

नोटा

727

 

****

 

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 102-बदनापूर विधानसभा मतदार संघातून कुचे नारायण तिलकचंद विजयी

 



 

जालना, (जिमाका)दि.23: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 102-बदनापूर मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज येथील कृषि महाविद्यालय, बदनापूर येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सरिता सुत्रावे यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला. 102-बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार कुचे नारायण तिलकचंद यांना 1,38,489 मते मिळाली. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बबलु नेहरुलाल चौधरी यांना 92,958 इतकी मते मिळाली. यात भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार कुचे नारायण तिलकचंद 45,531 मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करुन निवडणूक निर्णय अधिकारी सरिता सुत्रावे यांनी कुचे नारायण तिलकचंद यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सरिता सुत्रावे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी डमरे यांची उपस्थिती होती.

102-बदनापूर विधानसभा मतदारसंघातून एकुण 17 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते  प्राप्त झाली आहेत.

 

.क्र.

उमेदवारांचे नांव

पक्ष

मिळालेली मते

1

कुचे नारायण तिलकचंद

भारतीय जनता पार्टी

1,38,489

2

बबलु नेहरुलाल चौधरी

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

92,958

3

अन्ना साईनाथ चिन्नादोरे

स्वाभिमानी पक्ष

1,050

4

आदमाने दिनेश दत्तात्रय

रिपब्लिकन सेना

420

5

कटके जयश्री संजय

महाराष्ट्र स्वराज्य पार्टी

461

6

नाडे ज्ञानेश्वर दगडुजी

ऑल इंडिया फारवर्ड ब्लॉक

307

7

शैलेंद्र सुदाम मिसाळ

पिपल्स पार्टी ऑफ इंडीया (डेमोक्रेटीक)

4,574

8

सतिश शंकरराव खरात

वंचीत बहुजन आघाडी

4,965

9

संदीप आसाराम गवळी

समता पार्टी

138

10

काकासाहेब बाबुराव भालेराव

अपक्ष

608

11

गायकवाड संगिता अंकुश

अपक्ष

253

12

चाबुकस्वार राहुल निरंजन

अपक्ष

159

13

बाबासाहेब हरिभाऊ खरात

अपक्ष

209

14

राजेश ओंकारराव राऊत

अपक्ष

493

15

सचिन विलकिसन कांबळे,

अपक्ष

916

16

सौ. सुश्मिता सुभाष दिघे

अपक्ष

1,242

17

ॲड. संतोष काशिनाथ मिमरोट

अपक्ष

1,145

18

नोटा

1,122

 

****