Sunday, 30 November 2025

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध जालना दि.30 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शनिवार दि.13 डिसेंबर 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे. आगामी शैक्षणिक सत्राकरीता सहावीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉग-इन करावे आणि प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्यावी. परीक्षा केंद्रावरील प्रवेशासाठी हे प्रवेशपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते आता https://cbseitms.rcil.gov.in/nvs अधिकृत संकेतस्थळावरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. तरी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षक व मुख्याध्यापकांनी याची नोंद घ्यावी. तसेच संकेतस्थळावरुन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करावेत. तरी उमेदवारांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या दिवशी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी प्रवेशपत्रावर दिलेल्या परीक्षा केंद्राचे ठिकाण, वेळेची माहिती आणि सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्यांचे पालन करावे, असे आवाहन अंबा-परतूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी.पवार यांनी केले आहे. -*-*-*-*-

 

जवाहर नवोदय विद्यालय

प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

 

 

         जालना दि.30 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शनिवार दि.13 डिसेंबर 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे. आगामी शैक्षणिक सत्राकरीता सहावीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉग-इन करावे आणि प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्यावी. परीक्षा केंद्रावरील प्रवेशासाठी हे प्रवेशपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते आता https://cbseitms.rcil.gov.in/nvs अधिकृत संकेतस्थळावरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. तरी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षक व मुख्याध्यापकांनी याची नोंद घ्यावी. तसेच संकेतस्थळावरुन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करावेत. तरी उमेदवारांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या दिवशी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी प्रवेशपत्रावर दिलेल्या परीक्षा केंद्राचे ठिकाण, वेळेची माहिती आणि सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्यांचे पालन करावे, असे आवाहन अंबा-परतूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी.पवार यांनी केले आहे.

-*-*-*-*-

Friday, 28 November 2025

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्यादा बंद ठेवण्याचे आदेश जारी जालना दि.28 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. या कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि परतूर येथील नगरपरिषदेसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार असुन मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी तसेच निवडणुक प्रक्रिया मुक्त व शांततामय मार्गाने होणे आवश्यक आहे. तरी जिल्हाधिकारी, जालना यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान झालेल्या अधिकारानुसार जालना जिल्ह्यातील नगरपरिषद निर्वाचन क्षेत्रातील सर्व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्य विक्री करणाऱ्या अनुज्ञप्त्यांचे (सीएल-2, सीएल-3, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4 आणि एफएलबीआर-2) व्यवहार दि.1 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच मतदानाच्या अगोदरच्या दिवशी संपुर्ण दिवस, दि. 2 डिसेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी आणि दि.3 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी संपुर्ण दिवस पुर्णत: बंद ठेवावी. असे आदेश जिल्हाधिकारी, जालना यांनी जारी केले आहेत. -*-*-*-*-

 

स्थानिक  स्वराज्य  संस्था  सार्वत्रिक  निवडणूक -2025

जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी

 

 

      जालना दि.28 (जिमाका) :- राज्य निवडणूक  आयोगाने  स्थानिक  स्वराज्य  संस्था  सार्वत्रिक  निवडणूक -2025  साठी  दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी  कार्यक्रम  जाहीर  केला  आहे.  निवडणूक  कार्यक्रम जाहीर  केल्याच्या  दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. या कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि परतूर येथील नगरपरिषदेसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार असुन मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी तसेच निवडणुक प्रक्रिया मुक्त व शांततामय मार्गाने होणे आवश्यक आहे. तरी  जिल्हाधिकारी, जालना  यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान झालेल्या अधिकारानुसार जालना जिल्ह्यातील नगरपरिषद निर्वाचन क्षेत्रातील सर्व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्य विक्री करणाऱ्या अनुज्ञप्त्यांचे (सीएल-2, सीएल-3, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4 आणि एफएलबीआर-2) व्यवहार दि.1 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच मतदानाच्या अगोदरच्या दिवशी संपुर्ण दिवस, दि. 2 डिसेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी आणि दि.3 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी संपुर्ण दिवस पुर्णत: बंद ठेवावी. असे आदेश जिल्हाधिकारी, जालना यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-

 

 

           

 

Thursday, 27 November 2025

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून डिजीटल युगास प्रारंभ जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी तीन अभिनव माहिती तंत्रज्ञान उपक्रमाची सुरुवात • जिल्हाधिकाऱ्यांची भेट आता एका क्लिकवर जालना, दि. 27 (जिमाका) :- जालना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि सक्षम तांत्रिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली हे उपक्रम विकसित करण्यात आले असून जिल्ह्याच्या डिजिटल युग प्रारंभ परिवर्तनातील हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. या उपक्रमांमुळे शासकीय कार्यालयातील कामे आता घरबसल्या तसेच अगदी कमी वेळात पूर्ण करता येतील. तरी नागरिकांनी या डिजिटल सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि प्रशासनाच्या या डिजीटल प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. “मिट युवर कलेक्टर” या वेब-आधारित अॅशप्लिकेशनद्वारे नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ऑनलाईन स्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे भेट प्रक्रियेचे पूर्वनियोजन, वेळेची स्पष्टता आणि तक्रार निवारणातील कार्यक्षमता वाढणार आहे. कृषी क्षेत्रासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअप चॅटबोट “ऍग्रीपथ” (9172814066) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेत रस्ता अतिक्रमणमुक्ती, नवीन शेतरस्ता प्रस्तावासाठी अर्ज तयार करणे, सरकारी सेवांची माहिती मिळवणे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी त्वरित संपर्क साधणे अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. “जालना मित्र” या सेवा चॅटबोटद्वारे (7387938774) नागरिकांना महा ई-सेवा केंद्रांच्या घरपोच सेवांसाठी अपॉइंटमेंट घेता येणार आहे. “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या या सेवेने नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या कमी होवून सेवा थेट घरपोच मिळण्यास मदत होणार आहे. या तीनही उपक्रमांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी उन्मेष सपकाळ आणि जिल्हा आयटी टीम यांच्या संयुक्त प्रयत्नांतून करण्यात आली आहे. हे तीन उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेत अधिकाधिक वृध्दी करतील आणि नागरिकांना संवाद साधणे अधिक सोपे होईल. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या माहिती तंत्रज्ञान आधारित सुविधा विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल आणि शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ पध्दतीने मिळण्यास मदत होईल. -*-*-*-*-

 

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून डिजीटल युगास प्रारंभ

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी तीन

अभिनव माहिती तंत्रज्ञान उपक्रमाची सुरुवात

 

·         जिल्हाधिकाऱ्यांची भेट आता एका क्लिकवर

 

जालना, दि. 27  (जिमाका) :- जालना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि सक्षम तांत्रिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली हे उपक्रम विकसित करण्यात आले असून जिल्ह्याच्या डिजिटल युग प्रारंभ परिवर्तनातील हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे.  या उपक्रमांमुळे शासकीय कार्यालयातील कामे आता घरबसल्या तसेच अगदी कमी वेळात पूर्ण करता येतील. तरी नागरिकांनी या डिजिटल सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि प्रशासनाच्या या डिजीटल प्रवासात सहभागी व्हावे, असे  आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 मिट युवर कलेक्टर या वेब-आधारित अ‍ॅप्लिकेशनद्वारे नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ऑनलाईन स्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे भेट प्रक्रियेचे पूर्वनियोजन, वेळेची स्पष्टता आणि तक्रार निवारणातील कार्यक्षमता वाढणार आहे. कृषी क्षेत्रासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअप चॅटबोट ऍग्रीपथ (9172814066) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेत रस्ता अतिक्रमणमुक्ती, नवीन शेतरस्ता प्रस्तावासाठी अर्ज तयार करणे, सरकारी सेवांची माहिती मिळवणे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी त्वरित संपर्क साधणे अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. जालना मित्र या सेवा चॅटबोटद्वारे (7387938774) नागरिकांना महा ई-सेवा केंद्रांच्या घरपोच सेवांसाठी अपॉइंटमेंट घेता येणार आहे. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या या सेवेने नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या कमी होवून सेवा थेट घरपोच मिळण्यास मदत होणार आहे. या तीनही उपक्रमांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी उन्मेष सपकाळ आणि जिल्हा आयटी टीम यांच्या संयुक्त प्रयत्नांतून करण्यात आली आहे.  हे तीन उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेत अधिकाधिक वृध्दी करतील आणि नागरिकांना संवाद साधणे अधिक सोपे होईल. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या माहिती तंत्रज्ञान आधारित सुविधा विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल आणि शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ पध्दतीने मिळण्यास मदत होईल.

-*-*-*-*-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन जालना, दि. 27 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणिकरण करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी दि.18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तरी महिलांना विविध अडचणींना सामोरे जावे लागल्याने ई-केवायसी करण्यास आता दि.31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र लाभार्थी महिलांनी पडताळणी आणि प्रमाणिकरण करण्यासाठी ई-केवायसी वेळेत करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. -*-*-*-*-

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील

महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

 

जालना, दि. 27  (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणिकरण करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी दि.18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तरी महिलांना विविध अडचणींना सामोरे जावे लागल्याने ई-केवायसी करण्यास आता दि.31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र लाभार्थी महिलांनी पडताळणी आणि प्रमाणिकरण करण्यासाठी ई-केवायसी वेळेत करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

स्वातंत्र सैनिक निवृत्तीवेतन धारकांना आवाहन जालना, दि. 27 (जिमाका) :- स्वातंत्र सैनिक निवृत्तीवेतन घेणारे सर्व स्वातंत्र सैनिक, स्वातंत्र सैनिक वारस पत्नी निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालय, जालना येथे सादर करणे आवश्यक आहे. हयात प्रमाणपत्र विलंबाने प्राप्त झाल्यास निवृत्तीवेतन प्रदान करण्यास विलंब होईल. तरी जालना व बदनापूर तालुक्यातील स्वातंत्र सैनिक निवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यक्तींनी हयातीचे प्रामणपत्र दि.31 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी केले आहे. -*-*-*-*-

 

स्वातंत्र सैनिक निवृत्तीवेतन धारकांना आवाहन

 

जालना, दि. 27  (जिमाका) :- स्वातंत्र सैनिक निवृत्तीवेतन घेणारे सर्व स्वातंत्र सैनिक, स्वातंत्र सैनिक वारस पत्नी निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालय, जालना येथे सादर करणे आवश्यक आहे. हयात प्रमाणपत्र विलंबाने प्राप्त झाल्यास निवृत्तीवेतन प्रदान करण्यास विलंब होईल. तरी जालना व बदनापूर तालुक्यातील  स्वातंत्र सैनिक निवृत्तीवेतन  घेणाऱ्या व्यक्तींनी हयातीचे प्रामणपत्र दि.31 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी केले आहे.

-*-*-*-*-

Wednesday, 26 November 2025

जाफ्राबाद तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना आवाहन

 

 

जालना, दि. 26  (जिमाका) :- सामाजिक विशेष अर्थसहाय्य योजनेंतर्गत जाफ्राबाद तालुक्यात एकुण 20 हजार 672 लाभार्थी आहेत. त्यापैकी दिव्यांग लाभार्थी 1 हजार 303 असून युडीआयडी व आधार  संलग्नीकरण 403 लाभार्थ्यांचे यशस्वीरित्या पुर्ण झाले आहे. जे अत्यंत कमी आहे. त्यामुळे जाफ्राबाद तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी क्रमांक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि ई- आधारकार्ड तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात स्वत: जमा करावेत, जर लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा केली नाही तर त्यांचा लाभ कायमचा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन जाफ्राबाद तहसीलदार डॉ.सारिका भगत व नायब तहसीलदार मंगेश साबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

 

समाज कल्याण विभागाकडून संविधान दिन उत्साहात साजरा

 




 

 

जालना, दि. 26  (जिमाका) :- भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत  बुधवार दि. 26 नोव्हेबर 2025 रोजी संविधान दिन सहायक आयुक्त,समाजकल्याण जालना या कार्यालयात साजरा करण्यात आला आहे.  मुख्य कार्यक्रमापुर्वी संविधान सन्मान रॅली व सहायक आयुक्त, समाज कल्याण जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जनजागृती रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. रॅलीचा प्रारंभ मंठा चौफुली येथून झाला आणि विद्यार्थ्यांनी संविधान मूल्यांच्या घोषणा देत मस्तगड येथे मार्गक्रमण केले. मस्तगड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील दुपारी 12.30 वाजता मुख्य कार्यक्रमास कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी आशिमा मित्तल ,उदघाटक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे, सेवानिवृत्त उपप्राचार्य बी.वाय.कुलकर्णी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. राजकुमार म्हस्के ,  तसेच अविनाश बहिर आदि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे यांनी केले . तद्नंतर संविधान उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी संविधान उद्देशपत्रिकेतील समान संधी या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संविधानातील मूल्यांना दैनंदिन आयुष्यात जगण्याचे आवाहन केले . तसेच शासकीय वसतिगृह निरीक्षण समितीच्या अध्यक्ष या नात्याने वसतिगृह व शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सोयी- सुविधा  देण्यासाठी व त्यांच्या अडचणी समजून त्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या उ्दघाटक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना श्रीमती मिन्नू पी.एम यांनी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन संविधानातील मुलभूत तत्वावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते से.नि उपप्राचार्य बी.वाय.कुलकर्णी यांनी संविधानातील मूलभूत मूल्यांवर प्रभावी विचार व्यक्त केले. तसेच डॉ. राजकुमार म्हस्के यांनी संविधानाबाबत आपले विचार व्यक्त केले. इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अविनाश बहिर यांनी उपस्थितास मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये  जिल्हाधिकारी जालना यांच्या हस्ते राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांच्या हस्ते शासकीय निवासी शाळा व वसतिगृहातील संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना, सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच शासकीय निवासी शाळा बदनापूर येथील राज्यस्तर व विभागस्तर क्रिडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सत्कार करण्यात आला. मुलींची शासकीय निवासी शाळा जालना येथील विद्यार्थींनी संविधानावर आधारित पथनाट्य कार्यक्रमात सादर केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी यांनी केले. कार्यक्रमात सहायक आयुक्त,समाजकलयाण जालना कार्यालयातील व सर्व शासकीय वसतिगृह , शासकीय निवासी शाळा कार्यालयातील सर्व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.  राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. असे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

जात प्रमाणपत्र पडताळणी कडून विशेष मोहिमेचे आयोजन

 


 

जालना, दि. 26  (जिमाका) :- भारतीय संविधानाला 75 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमाचे औचित्य साधुन जालना जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत दि. 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत समिती कार्यालयात विशेष मोहिम शिबिर राबविण्यात येत आहे. समिती कार्यालयात दररोज कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी तसेच अर्जदार, पालक यांच्या उपस्थितीत त्यांना संविधानाचे वाचन,भारतीय संविधानाचे महत्व याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच समितीने वैध करण्यात आलेल्या प्रकरणात अर्जदार यांना ऑनलाईन प्रक्रियेव्दारे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे.असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य संगीता मकरंद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 मंगळवारी साप्ताहिक बाजार राहणार बंद

 


 

जालना, दि. 26  (जिमाका) :- राज्य निवडणूक  आयोगाने  स्थानिक  स्वराज्य  संस्था  सार्वत्रिक  निवडणूक-2025  साठी  दि. 4 नोव्हेंबर, 2025 रोजी  कार्यक्रम  जाहीर  केला आहे.  निवडणूक  कार्यक्रम जाहीर  केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. कार्यक्रमानूसार अंबड, भोकरदन व परतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी दि.2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. तरी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता अंबड, भोकरदन व परतूर या शहरातील साप्ताहिक बाजार मंगळवार दि.2 डिसेंबर 2025 रोजी संपुर्णत: बंद ठेवावेत तसेच खाजगी आस्थापनामधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

-*-*-*-*-

 

भारतीय संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामुहिक वाचन जालना, दि. 26 (जिमाका) :- भारतीय संविधान दिन हा जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी उपस्थितांसह भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी सुकेशिनी पगारे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांना प्रोत्साहन देणे आणि संविधानाबद्दल जनजागृती करणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये आजच्या दिवशी भारताच्या संविधान सभेने संविधान स्वीकारले होते. हा दिवस संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाला समर्पित आहे. अपर जिल्हाधिकारी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांप्रति आपली निष्ठा आणि वचनबद्धता यावेळी व्यक्त केली. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून, ते देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. या कार्यक्रमातून संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच मूलभूत कर्तव्यांची जाणीव ठेवून देशाची एकात्मता आणि अखंडता कायम राखण्याचा संकल्पही सर्वांनी यावेळी केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. -*-*-*-*-


 

भारतीय संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामुहिक वाचन

 

जालना, दि. 26  (जिमाका) :- भारतीय संविधान दिन हा जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी उपस्थितांसह भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी सुकेशिनी पगारे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांना प्रोत्साहन देणे आणि संविधानाबद्दल जनजागृती करणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये आजच्या दिवशी भारताच्या संविधान सभेने संविधान स्वीकारले होते. हा दिवस संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाला समर्पित आहे. अपर जिल्हाधिकारी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांप्रति आपली निष्ठा आणि वचनबद्धता यावेळी व्यक्त केली. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून, ते देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. या कार्यक्रमातून संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच मूलभूत कर्तव्यांची जाणीव ठेवून देशाची एकात्मता आणि अखंडता कायम राखण्याचा संकल्पही सर्वांनी यावेळी केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

Tuesday, 25 November 2025

जालना शहरातील भटक्या जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करणार जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल

 

           

जालना, दि. 25(जिमाका): जालना शहरातील वाढत्या भटक्या जनावरांच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी मनापाच्या संबंधित विभागांना कठोर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी जनावरे मोकाट फिरत असल्याने वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांना होणारा त्रास वाढत चालला आहे. शहरातील रस्त्यांवर सोडल्या जाणाऱ्या भटक्या जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा आयुक्त जालना शहर महानगरपालिका आशिमा मित्तल यांनी दिले.

         जिल्हाधिकारी मित्तल यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, ज्या मालकांकडून जनावरे रस्त्यावर सोडली जातात, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, आवश्यक असल्यास कायदेशीर पावले देखील उचलली जातील. शहरातील स्वच्छता, सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही शिथिलता सहन केली जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले. मनपा, पशुसंवर्धन विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे याकरीता नियमित मोहीम राबविण्यात येणार आहे. भटक्या जनावरांना ताब्यात घेऊन शासकीय गो-शाळा येथे  ठेवण्यात येईल, मालकांची ओळख पटवून नियमांनुसार दंड वसूल करुन सदरील जनावरे त्यांच्या मुळ मालकांना हस्तातंरित करण्यात येणार आहेत.

         जिल्हाधिकारी मित्तल यांनी नागरिकांनीही या मोहिमेकरीता पुढे येत सहकार्याची विनंती केली आहे. रस्त्यावर जनावरे सोडणे ही कायद्याने दंडनीय कृती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छ व सुरक्षित शहर  आणि वाहतुकीला अडथळामुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही  आवाहन त्यांनी केले.

 

 

-*-*-*-*-

युवा महोत्सव-2025 उत्साहात संपन्न आत्मविश्वासाने आणि निर्धाराने केलेले कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल




 


 

जालना, दि. 25  (जिमाका) :- सध्याच्या काळात मुलींनी स्वावलंबी होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, त्यामुळे मुलींनी प्रथम स्वप्न पहावे आणि ते पुर्ण करण्यासाठी खंबीरपणे उभे राहणे प्रथमत: आवश्यक आहे. प्रत्येक मुलीने स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करावेत. तरी आत्मविश्वासाने आणि निर्धाराने केलेले कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

            जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव-2025 चे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले होते. यावेळी क्रीडा अधिकारी लता लोंढे, आरती चिल्लारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक आशिष जोगदंड तर परिक्षक म्हणून डॉ.शोभा यशवंते डॉ.मारोती घुगे, डॉ.दिगांबर दाते व डॉ.कन्नुलाल पिठोरे, यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, यशाला शॉर्टकट नसतो. कठोर परिश्रमाला कोणताही पर्याय नाही. आज जे कष्ट केले जातील, ते उद्या नक्कीच चांगले भविष्य घेऊन येतील. त्यामुळे 16-24 या वयातील विद्यार्थी जीवनातील जिद्दीने आणि मेहनत सातत्याने केल्यास यातून संपुर्ण जीवनभराची यशाच्या रुपाने शिदोरी प्राप्त होत असते. प्रत्येक मुलीने आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने आणि निष्ठेने काम करत रहावे, यशासाठी कष्ट करणे अनिवार्य आहे. "जर तुम्ही आज कष्ट सहन केले, तर उद्या नक्कीच चांगले भविष्य प्राप्त होईल," असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. मुलींनी आत्मविश्वासाने कठोर परिश्रम करत आपले ध्येय साध्य करावे आणि उज्ज्वल भविष्याची निर्मिती करावी. काही अडचण असल्यास आपण सर्व मला जिल्हाधिकारी कार्यालयात भेटायला सुध्दा येवू शकतात, माझ्या कार्यालयात तुमचे नेहमी स्वागत आहे. असेही त्यांनी सांगितले.

युवकांमध्ये सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन करणे, तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे, या प्रमुख उद्देशांने युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवामध्ये यशस्वी होणारे स्पर्धक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पात्र ठरतात. या महोत्सवात समूह लोकनृत्य, लोकगीत, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, एकांकिका, विज्ञान स्पर्धा, कथालेखन तसेच इतर सांस्कृतिक आणि रचनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या  युवा महोत्सवात 15 ते 21 वयोगटातील तरुण-तरुणींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.  युवा महोत्सवात सादर झालेल्या विकी गणेश कुलकर्णी  यांच्या कुंभारापरी तू भिमा समाजाला घडविले, तसेच राणी उंचेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी   कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची या गाण्यातील भावनात्मक आशय, शब्दांची ताकद आणि गायनशैली यामुळे श्रोते भारावून गेले. सर्व श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देत गाण्याची प्रशंसा केली. युवा महोत्सव यशस्वीतेसाठी क्रीडा विभागातील संतोष प्रसाद, अमोल मुसळे, राहुल राठोड, राहुल गायके आणि हारुण शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-