Friday, 28 August 2020

1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम

 


      जालना दि.28 (जि.मा.का.) :-1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडील दि. 21 ऑगस्ट 2020 च्या पत्रान्वये आयोगाने जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द करण्याबाबत कार्यक्रम पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आला आहे.

             बाब आणि कालावधीचा दिनांक. दावे हरकती निकाली काढण्याचा दि. 27 ऑगस्ट 2020 गुरुवार पर्यंत होता. मतदार यादीची तपासणी करणे आणि अंतिमरित्या प्रसिध्दी करण्यास परवानगी प्राप्त करणे दि. 7 सप्टेंबर 2020 सोमवारपर्यंत, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे दि. 18 सप्टेंबर 2020 शुक्रवार पर्यंत. मतदार यादीचे अंतिम प्रकाशन दि. 25 सप्टेंबर 2020 शुक्रवार पर्यंत याप्रमाणे आहे.

      भारत निवडणूक आयोगाच्या वरील वेळापत्रकानुसार विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी संबधित कार्यालयाकडून व मतदार नोंदणी अधिकारी तथा उ.वि.अ./सह मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या स्तरावर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी जालना यांनी प्रसिध्दी पत्राकाव्दारे कळविले आहे.

                                                                             ******  

No comments:

Post a Comment