Monday, 24 August 2020

एम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत पाचव्या आठवड्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव

 


            जालना दि. 24 (जिमाका) :- कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कोव्हीड रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सेवक व सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आलेल्या एम्प्लॉई ऑफ वीक उपक्रमांतर्गत  पाचव्या  आठवड्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोव्हीड योद्धयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते  रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.  आजरोजीची बक्षिसाची रक्कम उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर यांनी दिली.  यावेळी डॉ. कडले, डॉ. खंडागळे उपस्थित होते.

            यामध्ये उत्कृष्ट डॉ. गणेश काळे  यांना चार हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर उत्कृष्ट कोऑर्डीनेटर मनोज आलसिंग जाधव  यांना दोन हजार पाचशे रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र ,  उत्कृष्ट अतिदक्षता विभागातील श्रीमती मोहिनी बबनराव लामधाडे  यांना दोन हजार पाचशे रुपयांचा तर किचन कर्मचारी इम्रान शेख बशीर यांना एक हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पहिल्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी स्वत: दिली होती तर दुसऱ्या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम डॉ. संजय जगताप, तिस-या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी दिली, चौथ्याआठवड्यातील बक्षिसांची रक्कम अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली. 

No comments:

Post a Comment