Monday, 14 October 2019

केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणे तर्फे महा मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन



                जालना, दि. 14 - भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो, पुणे, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य व स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महा मतदार जनजागृती अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते रिबन कापून व व्हॅनला झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आले. यावेळी फिल्ड आउटरिच ब्यूरो, औरंगाबादचे सहा. निदेशक, निखिल देशमुख, प्रबंधक, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.
या             अभियानामध्ये फिरते प्रदर्शन वाहन व सांस्कृतिक (लोककला) कार्यक्रमाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दिनांक 14 व 18 ऑक्टोबर पर्यंत जालना, परतूर, भोकरदन व बदनापुर मतदारसंघातील 15 ते 20 ठिकाणांना रोज हे फिरते प्रदर्शन वाहन भेट देईल. नागरिकांना मतदानाचे महत्‍व पटवून देण्‍याकरिता या महा मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment