Tuesday, 1 October 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ एकुण 09 उमेदवारांनी दाखल केले 11 नामनिर्देशनपत्र



            जालना दि. 1 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्‍या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात मंगळवार दि.1 ऑक्टोबर २०१९ रोजी एकुण 09 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. 
            99-परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये यादव विलास एकनाथ (अपक्ष), बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) (भारतीय जनता पार्टी) अशी एकुण दोन नामनिर्देशनपत्रे.     100-घनसावंगी मतदारसंघामध्ये कल्याण बाबुराव चिमणे (अपक्ष), रंजीता ऱ्हदयनाथ माने (अपक्ष) एकुण दोन नामनिर्देशनपत्र, 101-जालना विधानसभा मतदारसंघामध्ये अर्जुनराव उर्फ अर्जुन पंडितराव खोतकर (शिवसेना) दोन नामनिर्देशनपत्र, संगीता कैलास गोरंट्याल (इंडियन नॅशनल काँग्रेस) व (अपक्ष) अशी दोन नामनिर्देशनपत्रे, राहुल संमसन शिंदे (अपक्ष), नंदा परमेश्वर पवार (अपक्ष) अशी एकुण सहा नामनिर्देशनपत्रे, 102 बदनापुर विधानसभा मतदारसंघामध्ये                 डॉ. अश्विनी सदाशिव गायकवाड (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) तर 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये एकाही उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही, अशी माहिती त्या त्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment