Wednesday, 25 September 2024

माजी सैनिकांसाठी मेळावा

 

जालना, दि. 25 (जिमाका) :- मराठवाडा विभागातील माजी सैनिक, वीर नारी, वीर पिता, वीर माता व सर्व वयोवृध्द सैनिकांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील 97 आर्टीलरी ब्रिगेड सर्वत्रा ऑडीटोरियममध्ये शुक्रवार दि.27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी  6 वाजेपर्यंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पेंशन व स्पर्शसंबंधीत असलेल्या सर्व अडचणींचे निरसन करण्यासाठी पुणे येथील प्रधान नियंत्रक रक्षा लेखा कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment