जालना दि. 22 (जिमाका) :- जालना जिल्हा कोषागाराचे अधिनस्त सर्व निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना आवाहन करण्यात येते की, कोषागारामार्फत निवृत्तीवेनधारक यांना निवृत्तीवेतन/सुधारीत निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतनाविषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसूलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करुन संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सुचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरुपात पत्रव्यवहार केला जातो.
याबाबत
काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करुन ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत
रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास
प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही
प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार
कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.
सर्व
निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की, आपणास
दुरध्वनी/भ्रमणध्वनी वरुन उपरोक्त प्रदानासंदर्भात संपर्क साधुन रक्कम ऑनलाईन,गुगल
पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत जिल्हा कोषागार
कार्यालयामार्फत कळविले जात नाही. तरी कोणीही अशा दुरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ
नये. याबाबत निवृत्ती वेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकांची
वैयक्तिक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. तसेच अशा प्रकारच्या दुरध्वनी प्राप्त
झाल्यास कृपया कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापुर्वी
अथवा शंका असल्यास प्रथमत: कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन
जालना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत जिल्हा कोषागार अधिकारी व अप्पर कोषागार
अधिकारी (निवृत्तीवेतन) यांचेकडून करण्यात येत आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment