Thursday, 11 August 2022

जिल्हा पोलीस दलामध्ये 14 ऑगस्टला अमृत महोत्सवी दौड


    जालना दि. 11 (जिमाका) :-  “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पोलीस दलातर्फे दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 6.00 वाजता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 जालना एसआरपीएफ येथील पोलीस परेड ग्राऊंडवर 10 कि.मी. अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन केले आहे. सदर दौडचा समारोप पोलीस मुख्यालय परेड ग्रांउड येथे होणार आहे. सदर दौड निशुल्क असुन त्यामध्ये 15 वर्षावरील सर्वजण सहभागी होऊ शकतात.

  दौडमध्ये सहभागाकरीता संपर्क क्रमांक 9604121100, दुरध्वनी क्रमांक 02482-225100. गुगल लिंक पुढीलप्रमाणे आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe8vR4gTUTvTjQ1jZvVYW-DYqzH9Uk81qQYav-qyqN10SVVfw/viewform?usp=sf link

 यावर जाऊन आपली नाव नोंदणी करावी. दौडमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांना जालना पोलीस दलातर्फे  सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी दौडमध्ये जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी , तरुण तरुणी, महिला, सर्व नागरिक, पत्रकार बंधु           -भगिनी, व्यवस्थापक यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment