Thursday, 23 January 2020


राष्ट्रीय  मतदार दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
            जालना दि.23- दि.25 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून या दिवशी गांधी चमन, जुना जालना येथून जिल्हाधिकारी कार्यालय (मार्ग शनि मंदीर उड्डाण पुल ) पर्यंत सकाळी 8.00 वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. या फेरीत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक संस्थेचे सदस्य, एस आर पी कर्मचारी व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी इ.सामिल होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  येणार आहे.
या कार्यक्रमास अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जालना यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment