Thursday, 21 March 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 मोटार गाडया/वाहनांचा ताफ्याचा वापर करण्‍यास निर्बंध

 


 

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या / वाहने यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने नसावीत, असे निर्देश दिले आहेत, त्याअर्थी जालना जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटार गाड्या/वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment