Saturday, 16 September 2023

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

 


जालना, दि.17(जिमाका) :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगिता सानप, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक पराग नवलकर, जिल्हा‍ नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी,  तहसीलदार छाया पवार यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment