Wednesday, 25 May 2022

वीज कोसळण्यापूर्वी माहिती देणार “दामिनी ॲप”

 

 


 

जालना दि. 25 (जिमाका) :-  मान्सून कालावधीत विशेषत: जुन व जुलै या महिन्यात वीज पडून जीवीत हानी होत असते. वीज पडून जीवीत हानी होऊ नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी दामिनी ॲप तयार केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.  गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हे ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणा-या अलर्टनुसार आवश्यक पुर्वसुचना गावातील सर्व नागरीकांना देऊन होणारी जीवीतहानी टाळावी, अशी सूचना  निवासी उपजिल्हाधिकारी तथा  मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) केशव नेटके यांनी पत्राव्दारे केली आहे.

सुरक्षात्मक उपयायोजना म्हणुन तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा  शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरीक क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, महसूल सहायक, गांव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री  ऑपरेटर यांनाही हे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच या ॲपचे जीपीएस लोकेशनने काम करीत असून वीज पडण्याच्या  15 मिनिटापूर्वी या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. आपले ॲपमध्ये आपले सभोवताली वीज पडत असल्यास या ठिकाणापासून सुरक्षीत स्थळी जावे तसेच यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे  निर्देश नागरिकांना देण्यात यावे. तसेच इतर सामान्य नागरीक यांना हे ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे. तसेच दामिनी ॲप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत माहिती द्यावी.

 गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हे ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणा-या अलर्टनुसार आवश्यक पुर्वसुचना गावातील सर्व नागरीकांना देऊन होणारी जीवीतहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.  

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment