Monday, 13 July 2020

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ऑनलाईन समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्र



           
        जालना   दि. 13  (जिमाका)    :-    जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अंतर्गत
दि.15 जूलै 2020 रोजी दुपारी 4.00 वाजता  कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगार व स्वयंरोजगारची संधी या विषयावर ऑन लाईन वेबिनारच्या माध्यमातून समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन google meet वर  Meeting URL: https://meet.google.com/riw-icok-xwg  लिंकवर आयोजीत करण्यात आले आहे.
या ऑनलाईन समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगार व स्वयंरोजगारची संधी यावर  संचालक महाबँक ग्रामीण रोजगार प्रशिक्षिण संस्था जालना प्रदीप जोशी हे समुपदेशन व मार्गदर्शन करणार आहे. वेबिनार बाबत काही अडचण आल्यास (( 02482) 225504 या नंबर वर संपर्क साधण्याचे   आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशलय विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-*-



No comments:

Post a Comment