Wednesday, 15 June 2022

अधिकृत घोषणा होईपर्यंत वाहनधारकांनी समृध्दी महामार्गाचा प्रवासासाठी वापर करु नये

 


 

            जालना दि. 15 (जिमाका) :- औरंगाबाद, जालना व बुलढाणा जिल्ह्यातील समृध्दी महामार्गाचे बहुतांशी काम पुर्ण झालेले असल्यामुळे महामार्गावरुन अनधिकृत व विनापरवानगी वाहतूक वर्दळ सुरु आहे. अद्याप महामार्गावरुन अधिकृतपणे वाहतुकीस परवानगी दिलेली नसून वाहतुक सुरक्षिततेची काही कामे करणे प्रगतीत आहेत. अनधिकृत वाहतूकीमुळे काही ठिकाणी अपघात होऊन जीवित हानी देखील झालेली आहे. सर्व जनतेस व वाहनधारकांना आवाहन व विनंती करण्यात येते की, या महामार्गावर वाहतूक सुरु करण्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत समृध्दी महामार्गाचा प्रवासासाठी वापर करण्यात येऊ नये. अशी माहिती मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment