जालना, दि. 18 (जिमाका) :- -जालना जिल्हयामध्ये माहे नोव्हेंबर व डिसेंबर, २०२३ या कालावधीत
अवेळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानपोटी शासनाकडुन तालुका जाफ्राबाद, परतुर व घनसावंगी
येथील २, ०७, २१० बाधीत शेतक-यांसाठी १९१.७६ कोटी रक्कम मंजुर करण्यात आलेली असुन ८५,
३४४ बाधीत शेतक-यांना ७२.२३ कोटी निधी यापुर्वीच वितरीत करण्यात आलेला आहे. परत शासनाकडुन
दिनांक १७ जून २०२४ रोजी जिल्हयातील ३७, ६५२ शेतक- यांच्या खात्यात ४२.३२ कोटी रक्कम
जमा करण्यात आलेली आहे. व E-KYC प्रलंबित असलेल्या २५,९५० शेतकऱ्यांनी तात्काळ ई-महासेवा
केंद्रावर जावुन EKYC करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतक-यांना करण्यात
येत आहे.
तसेच दुष्काळामुळे
झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शासनाकडुन तालुका जालना, बदनापुर, भोकरदन, मंठा
व अंबड येथील ४,०७,२१८ बाधीत शेतक-यांसाठी ३८२.२१ कोटी रक्कम मंजुर करण्यात आलेली असुन
२,२१,६३३ बाधीत शेतक-यांना २३७.३१ कोटी निधी यापुर्वीच वितरीत करण्यात आलेला आहे. परत
शासनाकडुन दिनांक १७ जून २०२४ रोजी जिल्ह्यातील ५०,१७९ शेतक-यांच्या खात्यात ५५.१८
कोटी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. व EKYC प्रलंबित असलेल्या ३३,११३ शेतकऱ्यांनी तात्काळ
ई-महासेवा केंद्रावर जावुन EKYC करावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतक-यांना
करण्यात येत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे
कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment