जालना, दि.
17 (जिमाका) :- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाने मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण
योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जालना जिल्हयातील पात्र लाभार्थी
महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या
निमित्ताने शासनाकडून महिलांना मिळालेली ही उत्कृष्ट भेट आहे. यापुढेही नियमितपणे
या योजनेच्या माध्यमातून महिलांना रक्कम मिळणार आहे, त्यामुळे महिलांनी अजिबात
काळजी करु नये, अशी ग्वाही राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे
मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.
मुख्यमंत्री
–माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे
येथे आज पार पडला. या निमित्ताने या कार्यक्रमाचे थेट प्रसारण आणि लाभार्थी महिला,
उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार समारंभ
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी
पालकमंत्री बोलत होते.
कार्यक्रमास
आमदार
नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक
आयुष नोपाणी, जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी नवनाथ वामन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास ) कोमल कोरे
आदींसह पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित
होत्या.
पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, जालना जिल्हयात मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण
योजनेची जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेसह सर्व संबंधित विभागंनी अतिशय प्रभावीपणे
अंमलबजावणी केल्यामुळे ही
योजना यशस्वी झाली आहे. अगदी कमी कालावधीत सर्व आव्हानांवर मात करीत समन्वय व
सकारात्मकतेमुळे आपला जिल्हा ही योजना प्रभावीपणे राबवू शकला. या योजनेमुळे
सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार श्री. कुचे यांनी
मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार मानले.
सर्वसामान्य महिलांना अर्थिक सक्षम करणारी ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी जालना जिल्हयात या योजनेच्या प्रभावी
अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, समाज आणि
देशाची प्रगती ही
महिलांवरच अवलंबून असते. मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला
अर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी चांगले सहकार्य केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण
योजनेच्या माध्यमातून महिलांना रक्षाबंधनाची एक चांगली भेट मिळाली आहे. ही अतिशय
आनंदाची बाब आहे.
यावेळी काही लाभार्थी महिलांनी प्रातिनिधीक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले.
गोंदेगाव येथील मीरा वाघ म्हणाल्या की, शासनाचे आम्ही खूप आभारी आहोत. मुख्यमंत्री
–माझी लाडकी बहीण योजना ही खूप चांगली योजना आहे. रक्षाबंधनाची आम्हाला चांगली
ओवळणी मिळाली आहे. तर नंदा खंदारे म्हणाल्या की, या योजनेमुळे आम्हाला खूप आनंद
झाला. मुख्यमंत्री दादा आम्ही तुमचे आभारी आहोत. स्वप्नातसुध्दा आम्हाला वाटले
नाही की, अशा योजनेतून चांगला आर्थिक लाभ मिळेल.
प्रास्ताविक श्री. वामन यांनी केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी
महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. योजनेच्या यशस्वी
अंमलबजवणीबद्दल उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचाही गौरव
करण्यात आला.






























.jpg)


.jpg)
.jpg)


.jpg)




